Posts

Showing posts from February, 2021

वीजबिल वसुलीविरोधात मनसेचे फुटाणे मारो आंदोलन, धुळ्यात अभियंत्याला मारले फुटाणे..

धुळ्यात  महावितरणकडून  सुरू असलेल्या थकीत  वीजबिल  वसुलीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे.  वीजबिल  वसुलीविरोधात  मनसेचे  कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी थेट अधिक्षक अभियंत्यांचं कार्यालय गाठलं आणि त्यांच्यावर फुटाणे फेकून निषेध व्यक्त केला. धुळे जिल्ह्यात  महावितरणकडून  सक्तीची थकीत वीजबिल वसुली सुरू असल्याचा आरोप मनसेने केला आहे. लॉकडाऊनच्या काळात आलेली वाढीव वीजबिलं न भरण्याचा पवित्रा मनसेने घेतला आहे. त्यात मीटर कापण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना मनसे स्टाइल शॉक देऊ असा इशाराही याआधी मनसेच्या नेत्यांनी दिला होता. याच पार्श्वभूमीवर धुळ्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज वीजबिल वसुलीविरोधात आंदोलन केलं. अधिक्षक अभियंत्यांच्या टेबलावर फुटाणे फेकत त्यांना वीजबिल वसुलीबाबत जाब विचारण्यात आला.

आज जिल्ह्यात नव्याने 368 कोरोना रूग्ण आढळले.

Image
जळगाव :- जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यातून 368 बाधित रूग्ण आढळले आहे. तर 101 रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. यात जळगाव शहरासह चाळीसगाव आणि भुसावळ संसर्ग वाढलेला दिसून येत आहे.जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात . आज भुसावळ आणि चोपडा तालुक्यातील प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झालाआहे. अशी महिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांनी दिली आहे.

Dinwarta 23-02-2021

Image
 

जळगाव जिल्ह्यात आज 319 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.

Image
जळगाव: – जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्ण संख्येत सतत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज 319 बाधित रूग्ण आढळून आले आहेत .तर आज 80 रूग्ण कोरोनामुक्त झाली आहे. जळगाव शहरात सर्वाधिक 158 रुग्ण तर चाळीसगाव तालुक्यात 71रुग्ण आढळून आले आहेत.जिल्हयात सध्या 1301 ऍक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. आज 319 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने बाधित रुग्णांची संख्या 58854 इतकी झाली आहे.आज दिवसभरात 4 बाधित रुग्णांची मृत्यू झाला. आजपर्यंत 1375 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मतदार यादीसाठी 27 फेब्रुवारीपर्यंत छायाचित्र जमा करण्याचे आवाहन

जळगाव , (जिमाका) दि. 18 - जळगाव शहर मतदार संघाची अंतिम मतदार यादी दिनांक 15 जानेवारी, 2021 रोजी प्रसिद्ध झाली आहे. जळगाव शहर मतदार यादीत नाव आहे, परंतु छायाचित्र नाही असे एकूण 3804 मतदार आहेत. या मतदारांना बीएलओ यांनी वेळोवेळी संपर्क साधूनही त्यांनी अद्याप फोटो जमा केलेले नाहीत.  अशा मतदारांना अंतीमरीत्या सूचित करण्यात येते की, मतदार यादीत आपले नाव व फोटो आहे किंवा नाही याबाबत खातरजमा करण्यासाठी www.jalgaon.gov.in या संकेतस्थळावर आपले नावाची खात्री करुन 27 फेब्रुवारी, 2021 पावेतो आपले फोटो BLO यांचेकडे अथवा तहसील कार्यालयात जमा करावे.  ज्या मतदारांचे फोटो प्राप्त होणार नाहीत, अशी नावे कटाक्षाणे वगळली जाणार आहेत. नाव वगळले गेल्यास पुनश्च: फॉर्म नं. 6 भरुन नाव नोंदणी करता येईल. असे मतदार नोंदणी अधिकारी, 13 जळगाव शहर विधानसभा मतदार संघ, तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, जळगाव भाग, जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. 

जिल्ह्यात 7 मार्चपर्यंत 37 (1) (3) कलम लागू.

  जळगाव , (जिमाका) दि. 18 - सध्या कोरोना विषाणुच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 7 मार्च, 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) (3) लागू करण्यात आले आहे.   या कालावधीत शस्त्र, सोटे, भाले, तलवार, बंदुका, सुरे, लाठया व काठया किंवा शारीरिक दुखपती करण्यासाठी वापरात येतील, अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तु घेऊन फिरणे, अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ किंवा द्रव्ये बरोबर घेऊन फिरणे, दगड अगर इ. अस्त्रे किंवा शस्त्रे सोडावयाची अगर फेकावयाची हत्यारे, साधने इ. तयार, जमा करणे, आणि बरोबर नेणे, कोणत्याही इसमाच्या चित्रांचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्रांचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, सार्वजनिकरित्या ओरडणे किंवा विक्षिप्तपणे हावभाव करणे, सभ्यता अगर नितीमत्ता विरुध्द असतील अशी किंवा शांतता धोक्यात आणतील अशी भाषणे, हावभाव करणे, सोंग आणणे आणि तशी चिन्हे, चित्रे, फलक लावणे किंवा इतर कोणतेही असे जिन्नस अगर वस्तु तयार करणे अगर त्यांचा प्रसार करणे या कृत्यांना बंदी घाली...

Dinwarta 16-02-2021

Image
 

Dinwarta 02-02-2021

Image