Posts

Showing posts from 2023

महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी योगेश नन्नवरे यांची निवड.

Image
जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी चोपडा गोदाम व्यवस्थापक यांची महसूल कर्मचारी संघटनेच्या दि.०९ डिसेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या सर्व साधारण सभेत निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडी बद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येतं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत हॉल येथे महसूल कर्मचारी संघटनेची सर्व साधारण सभा संपन्न झाली सभेमध्ये सर्वानुमते जिल्हयाची खालील प्रमाणे नविन कार्यकारीणी गठीत करण्यात आली आहे. अध्यक्ष : श्री. योगेश नन्नवरे, गोदाम व्यवस्थापक चोपडा, उपाध्यक्ष : श्री. किरण बाविस्कर, मंडळ अधिकारी पिंप्राळा ता. जळगांव, कोषाध्यक्ष :घनश्याम सानप, अ. का. कुळकायदा शाखा, जि. का. जळगाव, कार्याध्यक्ष : अतुल सानप, अ. का. तहसिल कार्यालय रावेर, सरचिटणीस : दिपक चौधरी, अ.का. आस्थापना शाखा, नि.का. जळगांव वरील प्रमाणे नवनियुक्त पदाधिकारी दि.१०.१२.२०२३ पासुन जळगांव जिल्हा महसूल कर्मचारी संघटना चे कार्यभार स्विकारतील याची सर्वांनी नोंद घावी असे जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस दिनकर मराठे यांनी कळविले आहे.प्रमुख अतिथी म्हणून द...

विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे यांना दुपारच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका.

Image
 विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे यांना दुपारच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका आला दुपारी. जळगाव येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र, पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलविण्याचा निर्णय घेण्यात आले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने मुंबईत आणण्यात येणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने या घटनेची गंभीर दाखल घेतली असून त्यांनी खडसे यांना मुंबईला आणण्यासाठी एअर अम्बुलन्सची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.एकनाथ खडसे यांना मुंबईला हलविण्याची तयारी करण्यात येत होती. मात्र, तातडीने उपचार करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी प्रशासनाला खडसे यांच्यासाठी एअर अम्बुलन्सची व्यवस्था करण्याचा सूचना दिल्या. सूत्रांच्या हवाल्याने आता मिळालेल्या माहितीनुसार आमदार एकनाथ खडसे साहेब यांची तब्येत स्थिर आहे.

राष्ट्रीय महामार्गावर डंपरच्या धडकेने चार वर्षाच्या मुलीचाआईसमोरच मृत्यू.

Image
जळगाव :  जळगावमधून एक दुर्दैवी घटना समोर आलीय. भरधाव डंपरने धडक दिल्याने आईच्या डोळ्यासमोर ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल तनयजवळ घडली.प्रेरणा योगेश नेमाडे (वय-४) रा. माऊल नगर, जळगाव असे मयत चिमुकलीचे नाव आहे. तर या अपघातात तिची आई दक्षता ही किरकोळ जखमी झाली आहे. जळगाव शहरातील माऊली नगरातील रहिवासी असलेले योगेश नेमाडे यांची मुलगी प्रेरणा (वय ४) हि जळगाव पब्लिक स्कूलमध्ये नर्सरी वर्गात शिकत होती. नेहमीप्रमाणे प्रेरणाची शाळा सुटल्यानंतर तिची आई दक्षता नेमाडे तिला स्कूटीने घेण्यासाठी गेल्या होत्या. मुलगी प्रेरणाला स्कूटीने घरी घेवून जात असतांना राष्ट्रीय महामार्गावारील हॉटेल तनयजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत चिमुकली प्रेरणा गंभीर जखमी झाली. जखमी प्रेरणा हिला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन महाजन यांनी मयत घोषीत केले. दरम्यान, डंपर चालक डंपर सोडून पसार झाला होता. एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पुढील कारवाई करण्यात येत आहे. यावेळी जिल्ह...

अखेर राजपूत भामटा जमातीतील ‘भामटा’ या शब्दावर शासनाने घेतला निर्णय!

Image
मुंबई  । राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीमध्ये समावेश असलेल्या राजपूत भामटा या जमातीतील ‘भामटा’ हा शब्द वगळला जाणार नाही, असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. त्याचप्रमाणे खोट्या जात प्रमाणपत्रांबाबत एसआयटी नेमली जाईल आणि सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. राजपूत भामटा जमातीच्या नावातील भामटा शब्द वगळण्यासंदर्भात शासनाच्या भूमिकेबाबत सदस्य राजेश राठोड यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री श्री.सावे म्हणाले की, 1961 मधील शासन निर्णयात तसेच त्यानंतर 1993 मध्येही राजपूत भामटा जमातीचा उल्लेख आहे. त्यानंतर सन 2008 आणि 2010 मध्ये मागासवर्ग आयोगानेदेखील यातील भामटा शब्द काढता येणार नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे हा शब्द वगळला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विभागामार्फत मॅट्रिकपूर्व, मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांसाठी तसेच परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. परदेशी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी संख्या 50 वरून 75 करण्याचा शासनाचा विचार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी...

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर.

Image
 मुंबई प्रतिनिधी: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्येदेखील काही फेरबदल करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभाग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील. इतर २६ मंत्र्यांची खाती  पुढीलप्रमाणे : छगन भुजबळ  – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील  – सहकार राधाकृष्ण विखे-पाटील  – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार - वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय हसन मियाँलाल मुश्रीफ  – वैद्य...

महावितरण प्रशासना विरोधात आंदोलन नियमबाह्य बदल्या थांबवण्याकरता कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलन.

Image
जळगाव :- महावितरणाचे तंत्रज्ञांच्या केलेल्या बदल्या ह्या प्रशासकीय नियमबाह्य असून प्रशासकीय परिपत्रकाचा विनयभंग केलेला आहे बदली प्रक्रियेची चौकशी होईपर्यंत या आदेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने केले आहे. त्याकरिता गुरुवार दिनांक 6 जुलै पासून विभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. कामगार महासंघाने आंदोलनाकरिता चार जुलै रोजी वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन बेमुदत धरणे आंदोलन बाबत माहिती दिली आहे. प्रशासकीय बदल्या व विनंती बदल्या या संदर्भात कंपनीचे निश्चित धोरण परिपत्रक 514 मध्ये नमूद आहे. तरीही या परिपत्रकाला जळगाव विभागाने धाब्यावर ठेवले आहे. या परिपत्रकात बदलांबाबतचे मार्गदर्शन तत्त्वांचे उल्लंघन करून वरिष्ठ तंत्रज्ञान पदांचा कर्मचाऱ्यांचे आणि तंत्रज्ञ पदाच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या या नियमबाह्य करण्यात आले आहेत. महावितरणाच्या जळगाव विभागाने प्रशासकीय बदल्या या नियमबाह्य पद्धतीने केले असून या बदली प्रक्रियेची चौकशी होईपर्यंत त्या बदल्यांना स्थगिती मिळणे गरजेचे आहे. याबाबत संघ...

श्री क्षेत्र पद्मालय देवस्थान तीर्थस्थळास ‘ब’ वर्गाचा दर्जा

जळगाव (दि.२५) प्रतिनिधी* -  जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील श्री गणपती मंदिर देवस्थान, पद्मालय तीर्थस्थळांस ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत नुकतेच राज्यशासनाकडून ‘ब’  दर्जा प्राप्त झाल्याचे जाहिर करण्यात आले आहे. मराठी नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी (दि.२३ मार्च) झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहिर करण्यात आला आहे.श्री गणपती मंदिर देवस्थान पद्मालय येथे एकाच व्यासपीठावर डाव्या आणि उजव्या सोंडेचे स्वयंभू दोन गणेशजी विराजमान आहेत. अमोद आणि प्रमोद असे त्यांना संबोधले जाते. खान्देशासह महाराष्ट्राभरातून भाविकभक्त याठिकाणी श्रद्धेने येत असतात. शासनाने ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत श्री क्षेत्र पद्मालय देवस्थानाला ‘ब’ दर्जा द्यावा यासाठी अनेक वर्षांपासून भाविकांसह परिसरातील नागरीकांची मागणी होती. जिल्ह्याच्यादृष्टीने धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाचे महत्त्व असलेल्या पद्मालय देवस्थानाचा विकास तीर्थस्थळाच्या ‘ब’ दर्जामुळे करता येईल.   पद्मालय मंदिर भारतातील अडीच गणपती पिठांमध्ये एक आहे. हे मंदिर अर्धा पीठ म्हणून सन्मानीत आहे. मंदिरामध्ये दोन स्वयंभू दोन गणेश मूर्ती आहे...