महावितरण प्रशासना विरोधात आंदोलन नियमबाह्य बदल्या थांबवण्याकरता कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलन.



जळगाव:- महावितरणाचे तंत्रज्ञांच्या केलेल्या बदल्या ह्या प्रशासकीय नियमबाह्य असून प्रशासकीय परिपत्रकाचा विनयभंग केलेला आहे बदली प्रक्रियेची चौकशी होईपर्यंत या आदेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने केले आहे. त्याकरिता गुरुवार दिनांक 6 जुलै पासून विभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. कामगार महासंघाने आंदोलनाकरिता चार जुलै रोजी वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन बेमुदत धरणे आंदोलन बाबत माहिती दिली आहे.
प्रशासकीय बदल्या व विनंती बदल्या या संदर्भात कंपनीचे निश्चित धोरण परिपत्रक 514 मध्ये नमूद आहे. तरीही या परिपत्रकाला जळगाव विभागाने धाब्यावर ठेवले आहे. या परिपत्रकात बदलांबाबतचे मार्गदर्शन तत्त्वांचे उल्लंघन करून वरिष्ठ तंत्रज्ञान पदांचा कर्मचाऱ्यांचे आणि तंत्रज्ञ पदाच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या या नियमबाह्य करण्यात आले आहेत.
महावितरणाच्या जळगाव विभागाने प्रशासकीय बदल्या या नियमबाह्य पद्धतीने केले असून या बदली प्रक्रियेची चौकशी होईपर्यंत त्या बदल्यांना स्थगिती मिळणे गरजेचे आहे.
याबाबत संघटनेने पत्र देऊन विनंती केली आहे. मात्र तरीही बदली केलेल्या कर्मचाऱ्यांना बदली ठिकाणी रुजू होण्याकरिता कार्यमुक्त करण्यात आलेले आहे या प्रशासनाच्या मुजोरी व मनमानी पद्धतीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलना ठिकाणी आंदोलनात विभागीय सर्कल झोन अशा तिन्ही कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तरी संघटनेने जोपर्यंत कर्मचारी बदल्यांचा निर्णय होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन हे सुरूच राहणार आहे.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत