Posts

Showing posts from 2021

व्हॉट्सअ‍ॅपवर वर्तमानपत्रे शेअर करायला बंदी; उच्च न्यायालयाने दिले हे आदेश!

नवी दिल्ली :  दिल्ली उच्च न्यायालयाने व्हॉट्सअ‍ॅपला नवे निर्देश दिले आहेत. व्हॉट्सअॅप ग्रुपवर वर्तमानपत्रांच्या ऑनलाईन एडिशन अर्थात ई-वर्तमानपत्रे शेअर करणारे ग्रुप बंद करण्यात यावेत, अशी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली होती. व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मेसेजिंग अ‍ॅपवर पोस्ट होणारा मजकूर आणि त्याची सत्यासत्यता या मुद्द्यावरून गेल्या काही महिन्यांमध्ये मोठी चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. त्यासोबतच केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीमुळे लागू होणाऱ्या निर्बंधांचीही जोरदार चर्चा झाली. त्यानंतर आता या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं व्हॉट्सअ‍ॅपला हे निर्देश दिले आहेत. ई-वर्तमानपत्रे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शेअर “बेकादेशीरपणे आणि त्यासंदर्भातले अधिकार नसतानाही अशा प्रकारे ई-वर्तमानपत्रे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शेअर करण्यास मनाई करण्यात आली आहे”, असं न्यायमूर्ती संजीव नरूला यांनी आदेशामध्ये नमूद केलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यावर २४ डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने निर्देश दिले. या याचिकेमध्ये एकूण ८५ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची माहिती दिलेली आहे. तसेच, य...

Dinwarta 28-12-2021

Image
 

Dinwarta 21-12-2021

Image
 

तापी सूतगिरणीचा जिनिंग व प्रेसिंग प्रकल्प शेतकऱ्यांना ठरणार लाभदायक गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील

Image
चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीच्या जिनिंग व प्रेसिंग प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न जळगाव, दि. 20 (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यातील तापी आणि गिरणा नदीच्या खोऱ्याचा भाग हा कापूस व केळी पिकासाठी ओळखला जातो. या भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तापी सहकारी सूतगिरणीचा जिनिंग व प्रेसिंग प्रकल्प लाभदायक ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी केले. तापी सहकारी सूतगिरणीच्या धरणगाव रस्त्यावरील कार्यस्थळ परिसरात रेल मारुती जिनिंग व प्रेसिंगचे भूमिपूजन गृहमंत्री श्री. वळसे-पाटील यांच्या हस्ते आज दुपारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. विधान सभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार अनिल पाटील, पंचायत समितीच्या सभापती कल्पना पाटील, उपसभापती सूर्यकांत खैरनार, सूतगिरणी चेअरमन तथा माजी आमदार कैलास पाटील, व्हा. चेअरमन प्रभाकर पाटील, माजीमंत्री एकनाथराव खडसे, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.  गृहमंत्री श्री. वळसे- पाट...

जळगाव शहराच्या सांस्कृतिक समृद्धीला दिशा देणारा एक अभिनव कार्यक्रम भाऊंना भावांजली..

Image
जळगाव शहराच्या सांस्कृतिक समृद्धीला दिशा देणारा एक अभिनव कार्यक्रम म्हणजे परिवर्तन आयोजित - भाऊंना भावांजली महोत्सव होय. गेल्या पाच वर्षापासून परिवर्तन कला महोत्सव हा उपक्रम (आदरणीय भवरलाल भाऊ) मोठ्या भाऊंच्या भावांजली यानिमित्तानं राबवत आहे ..यातीलच दुसरे पुष्प काल दिनांक 13 डिसेंबर सोमवार रोजी मायादेवी रोटरी हॉल जळगाव येथे संस्कृतीक समृद्धी आणि माझे जळगाव या विषयांवर चर्चासत्र आयोजित करून गुंफण्यात आले. या परिसंवादात जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला, विचार मंचावर चर्चासत्रास खास आमंत्रित मान्यवर आणि या कार्यक्रमास उपस्थित जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील कार्यरत असलेले जवळपास सगळ्याच घटकांचे प्रतिनिधी ,ज्यांचे या शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीत योगदान किंवा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असतो असे सुज्ञ, बुद्धिजीवी श्रोते , प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते अश्या सुजाण आणि सुज्ञ लोकांची मांदियाळी या परिसंवादास लाभली . चर्चासत्रात सहभागी मान्यवरांनी अगदी मोजक्या शब्दात पण प्रभावी मांडणी करीत शहराच्या ...

स्वयंदीप प्रतिष्ठान डांभुर्णी चे संस्थापक सचिव प्रा.श्री.संदीप पाटील(सोनवणे) यांचा सत्कार..

Image
काँनफेडरेशन ऑफ एक्स पॅरामिलिटरी फोर्ससेस असोशियन ह्या माजी सैनिकांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या संघटनेने श्री संदीप निंबाजी पाटील (सोनवने) यांचा पाळधी ता. धरणगाव येथील कार्यक्रमात सत्कार केला .. देश सेवेसाठी सीमेवर तैनात सैनिक तसेच शहीद जवानांच्या पाल्याना विवध करिअर मार्गदर्शन आणि कोर्स व शिबिरात निःशुल्क प्रवेश दिल्याबद्दल स्वयंदीप प्रतिष्ठान डांभुर्णी चे संस्थापक सचिव प्रा.श्री.संदीप पाटील(सोनवणे) यांचा सत्कार करण्यात आला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जळगाव विमानतळावर स्वागत

Image
जळगाव, (जिमाका) दि. 17 - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी जळगाव विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.  यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महापौर जयश्रीताई महाजन, आमदार अनिल पाटील, माजीमंत्री एकनाथराव खडसे, माजीमंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनीही उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.  उपमुख्यमंत्री श्री. पवार हे आज जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा आणि जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेणार असून जळगाव जिल्हा दूध संघाच्या नवीन दूध प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर भुसावळ नगरपंचायतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पणही होणार आहेत. 

Dinwarta 14-12-2021

Image
 

Dinwarta 07-12-2021

Image
 

Dinwarta 01-12-2021

Image

Dinwarta 30-11-2021

Image
 

Dinwarta 23-11-2021

Image
 

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

Image
  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (ICC) नवी जबाबदारी मिळाली आहे. आयसीसीच्या क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली यांची निवड करण्यात आली आहे. त्याच्या आधी टीम इंडियाचा माजी कसोटी कर्णधार आणि गांगुलीचा सहकारी खेळाडू अनिल कुंबळे याने हे पद भूषवले होते. कुंबळे जवळपास नऊ वर्षे या पदावर राहिले. क्रिकेट समितीचे काम खेळाच्या अटी आणि नियमांचे निरीक्षण करणे आहे. अनिल कुंबळेने या पदावर तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता आणि त्यापेक्षा जास्त काळ ते पदावर राहू शकत नव्हेत. त्यामुळे त्यांना हे पद सोडावे लागले.   गांगुली यापूर्वी आयसीसी क्रिकेट समितीमध्ये निरीक्षक पदावर होता. गांगुलीने भारतासाठी एकूण 113 कसोटी, 311 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 7212 कसोटी आणि 11363 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. गांगुलीच्या खात्यात 32 कसोटी आणि 100 एकदिवसीय विकेट्स आहेत.

Dinwarta 16-11-2021

Image
 

रोज कोमट पाणी पिणाऱ्यांनो एकदा वाचा ! बघा यामुळे शरीरात काय काय घडत आहे.आजच जाणून घ्या..

शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य ठेवल्याने शरीर हायड्रेटे राहते. शरीरातील पाणी हे आपले चयापचय सुदृढ ठेवते. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कोमट पाणी पिल्यामुळे श रीराची घा ण साफ होते. कोमट पाणी पिण्यामुळे, शरीरातील विषारी द्रव मूत्रमार्गे बाहेर पडतात. सकाळी कोमट पाण्याचे सेवन केल्यास शरीर शुद्ध होते. पाणी तापवल्यानंतर त्याची चव बदलते म्हणून अनेकजण कोमट पाणी पिण्याचं टाळतात. आरोग्यासाठी कोमट पाणी उपयुक्त आहे. दिवसातून किमान तीन वेळा कोमट पाणी पिण्याची सवय लावून घेतल्यास आजारांपासून दूर राहता येतं. आयुर्वेदात पाण्याच्या तापमानातून बहुतांश रोगांवर उपचार केले जातात. कोमट पाणी पिल्यामुळे शरीराची घा ण साफ होते. याशिवाय हे रक्त स्वच्छ करण्यासही मदत करते. ते शरीराची त्वचा तजेलदार करते आणि कोरड्या त्वचेत आद्रता निर्माण करते. नियमितपणे कोमट पाणी पिण्यामुळे शरीरात पाण्याचे संतुलन राहते, ज्यामुळे मुरुमांचा त्रा स कमी होतो आणि त्वचेचे सौंदर्यही टिकते. सर्दी आणि सायनसपासून त्र स्त असलेल्यांना कोमट पाण्यासापासून आराम मिळतो. एकंदरितच, कोमट पाण्याचे बरेच फा-यदे असल्यानं त्याचा ...

Dinwarta 09-11-2021

Image
 

Dinwarta 02-11-2021

Image
 

डांभुर्णी येथे स्वयंदीप प्रतिष्ठान आयोजित ई-श्रम कार्ड नोंदणी व वाटप तसेच स्वयंदीप प्रतिष्ठान संचालित- सेतू सुविधा केंद्राचे उदघाटन मा.आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व उपस्थीत मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले..

Image
दिनांक- 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता गावातील मुख्य चौकात प्रातिनिधिक स्वरूपात 10 लाभार्थ्यांना ई-श्रम कार्ड प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले तसेच गावातील सर्वसामान्य नागरिकांच्या ई-श्रम कार्ड नोंदणी साठी शिबीर (कॅम्प) चेही मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उदघाटन करून सेवेचा प्रारंभ डांभुर्णी गावापासून करण्यात आला तसेच पुढे हे शिबिर उंटावद,चिंचोली, डोणगाव ,कोळन्हवी आडगाव -कासारखेडा ह्या पंचकृषितील गावामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे .. या कार्यक्रमाची प्रस्तावना स्वयंदीप प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव-संदीप पाटील (सोनवणे) यांनी केले व ई-श्रम कार्ड हे  असंघटित क्षेत्रातील कामगार तसेच मजूर यांच्यासाठी कसे उपयुक्त आहे याचे उद्दिष्ट काय याबाबतीत स्पष्टीकरण देऊन ग्रामीण भागात असंघटित क्षेत्रात येणाऱ्या मजुरांची विशेषतः ह्या गटात मोडणाऱ्या महिलांची संख्या मोठया प्रमाणात आहे म्हणून ग्रामीण भागात असा उपक्रम जास्त संयुक्तिक ठरतो असे प्रतिपादन केले .. ह्या कार्यक्रमात नानासाहेब आर.जी पाटील ,कासारखेडा सरपंच श्री.भागवत पाटील,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री राम पवार ,स्वराज्य ग्रुपचे...

अखेर आर्यनची सुटका जेल प्रशासनाची कारवाई पूर्ण.

मुंबई :  अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान 26 दिवसांनंतर अखेल जेलमधून बाहेर निघाला आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर गेल्या अनेक दिवसांपासून सुनावणी सुरू होती. पण सतत न्यायालयाकडून आर्यन आणि त्याच्या मित्रांचा जामीन अर्ज फेटाळला गेला. अखेर गुरूवारी झालेल्या सुनावणी दरम्यान आर्यन खान आणि अरबाज मर्चेंटला जामीन मंजूर झाला. त्यानंतर शुक्रवारी त्याची सुटका होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण आज त्याची तुरूंगातून सुटका झाली. त्यामुळे मन्नतवर आनंदाचे वातावरण आहे.आज पहाटे आर्थर रोड कारागृहाची जामीन पेटी उघडण्यात आली. त्या पेटीत आर्यन खानचा अर्जही होता. त्यावर आज जेल प्रशासनाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर आर्यन जेलमधून बाहेर आला आहे. आर्यन जेलमधून घरी आणण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला होता. जवळपास 26 दिवसांनंतर आर्यनला अखेर जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयाकडून बऱ्याच युक्तीवादानंतर देण्यात आलेला हा निकाल शाहरुखला मोठा दिलासा देणारा ठरला.आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अडकला त्या दिवसापासून शाहरुख सोशल मीडिया आणि मीडियापासून दूर होता. गुरूवारी आर्यनला जामीन मिळाल्यानंतर शाहरुखचा वकिलां...

Dinwarta 26-10-2021

Image