जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्र -आयोजित भविष्यावर बोलू काही ..
जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्र -आयोजित :-भविष्यावर बोलू काही .. या कार्यक्रमासाठी ठाणे शहरातील 18 वर्ष वयाखालील विविध 55 शाळेतील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन ठाणे येथील गडकरी रंगायतन सभागृहामध्ये दिनांक 9 डिसेंबर 2022 रोजी दुपारनंतरच्या सत्रात करण्यात आले होते... या कार्यशाळेसाठी ठाणे शहरातील 2000 विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षक यांचीही उपस्थिती लाभली .. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे ठाणे शहरातील नगरपालिका किंवा अशा शाळा निवडल्या गेल्या ज्यात सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिकतात आणि ह्या तळागाळातील सर्वसामान्य घटकातील मुलांना भविष्यातील विविध संधी, करिअरच्या विविध वाटा आणि प्रेरणादायी विचार व मार्गदर्शनपर व्याख्यान अशी कार्यक्रमाची रूपरेषा होती.. या मार्गदर्शनपर कार्यक्रमात मा.श्री.निलेश सांबरे, मा.श्री.गणेश शिंदे ,मा.श्री.संदीप पाटील (स्वयंदीप प्रतिष्ठान) मा.श्री.कैलासजी महापती या प्रमुख वक्त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले ..ज्यामध्ये मी करियर या विषयावर मुलांशी संवाद साधला..मा.श्री.गणेश गावडे(DCP),श्री.के...