Posts

Showing posts from May, 2021

Dinwarta 01-06-2021

Image
 

जळगाव जिल्ह्यात 7 जूनपर्यंत 37 (1) (3) कलम लागू

 जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 25 - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने शासनाने काही अटी व मार्गदर्शक तत्वे निर्गमित केलेले आहे. त्याचे तंतोतंत पालन होण्यासाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात 24 मे, 2021 च्या मध्यरात्रीपासून ते 7 जून, 2021 च्या मध्यरात्रीपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (3) लागू करण्यात येत आहे. असे अप्पर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.    कलम 37 (1) अंतर्गतचा हा आदेश ज्यांना हातात लाठी किंवा तत्सम वस्तु घेतल्याशिवाय चालता येत नाही, अशा वृध्द अथवा अपंग इसमांना लागू असणार नाही. त्याचप्रमाणे मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (3) अन्वये पांच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या कार्यालयाची पुर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास या आदेशान्वये बंदी घालीत आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेत यात्रा यांना लागु असणार नाही. परंतु जिल्हादंडाकारी, जळगाव यांचेकडील आदेश क्र. दंडप्र -01/ कावि/801/2021 दि. 15 म...

Dinwarta 25-05-2021

Image
 

कृषि विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी**30 जूनपर्यंत प्रस्ताव पाठवावे.

जळगाव, दि. 20 (जिमाका वृत्तसेवा) - राज्यात दरवर्षी शेती व पुरक क्षेत्रात अति उल्लेखनिय कार्य करणा-या शेतक-यास अथवा संस्थेस महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित विविध पुरस्कार राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते प्रदान करुन सन्मानित करण्यात येते.   पुरस्काराचे नाव - डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार- राज्यातून एक पुरस्कर देण्यात येतो.   पुरस्कार रक्कम 75 हजार रुपये. वसंतराव नाईक कृषिभुषण पुरस्कार - आठ कृषि विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 8 पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कार रक्कम 50 हजार रुपये. जिजामाता कृषिभुषण पुरस्कार- आठ कृषि विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 8 पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कार रक्कम 50 हजार रुपये. कृषिभूषण (सेंद्रिय शेती ) पुरस्कार - आठ कृषि विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 8 पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कार रक्कम 50 हजार रुपये. युवा शेतकरी पुरस्कार - आठ कृषि विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 8 पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कार रक्कम 30 हजार रुपये. वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार आठ कृषि विभागातून प्रत्य...

Dinwarta 18-05-2021

Image
 

ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव, (जिमाका) दि. 15 - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'ब्रेक द चेन' अंतर्गत लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची प्रशासनातील सर्व घटक पूर्ण ताकदीने अंमलबजावणी करीत असूनही बाधित रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत नाही, ही चिंतेची बाब आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापुढे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नियमांचे पालन करावे. अन्यथा प्रशासनास कठोर कारवाई शिवाय पर्याय उपलब्ध राहणार नाही. असा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिला. येथील पोलीस मुख्यालयातील प्रेरणा सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. भीमाशंकर जमादार, महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रशासन निर्बंधांची अंमलबजावणी प्रभावीपणे करत असूनही जिल्ह्यात काही नागरिक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण घराबाहे...

सणानिमित्त तीन दिवस किराणा दुकाने बारा वाजेपर्यंत सुरु राहणार

जळगाव, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) - मा. न्यायालयाकडील 26 एप्रिल, 2021 रोजीच्या निर्देशास अधीन राहून तसेच दिनांक 12 ते 14 मे, 2021 या कालावधीत रमजान ईद (ईद-उल-फितर) व अक्षयतृतीया या सणानिमित्त जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी विशेष निर्बंधामध्ये सुट दिली आहे.   दिनांक 12 ते 14 मे, 2021 या कालावधीत सकाळी 7.00 ते सकाळी 12.00 वाजेपर्यंत किराणा दुकाने, ड्रायफ्रुटस दुकाने, भाजीपाला, फळविक्री, अंडी/चिकन/मटन/मासे विक्रीची दुकाने, बेकरी, दुध विक्री केंद्रे सुरु राहतील. सणानिमित्त एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये याकरीता नागरिकांनी आपल्या प्रभागातील/वार्डातील दुकानातून खरेदी करावी. शक्यतो होम डिलिव्हरीस प्राधान्य देण्यात यावे व खरेदीसाठी जातांना नागरिकांनी शक्यतो वाहनाचा वापर टाळावा. दुकान मालक/चालक यांनी दुकानामध्ये एका वेळेस 5 पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश देऊ नये, तसेच दुकानासमोर गर्दी होऊ नये याकरीता दुकानासमोर वर्तुळ तयार करुन नागरिकांना सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्याबाबत सूचित करावे.   या बाबींसाठी देण्यात आलेल्या सुटमध्ये दुकानदार व नागरिक यांनी कोविड-19 नियमावलीचे पालन करावे. तसेच ...

राज्य शासनाने १८ ते ४४ वयोगटासाठी खरेदी केलेल्या लसीतून ४५ वर्षांवरील नागरिकांना देणार दुसरा डोस.

म्युकरमायकोसीस आजारावरील इंजेक्शनच्या १ लाख व्हायल्स राज्य शासन खरेदी करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई, दि. ११: राज्यात ४५ वर्षांवरील नागरिकांना राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत लसीकरण केले जात असून सुमारे ५ लाख नागरिक लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत आहेत. केंद्र शासनाकडून त्यासाठी पुरविण्यात आलेले डोस पुरेसे नसल्याने १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी राज्य शासनाने खरेदी केलेल्या डोसेसमधून दुसरा डोस देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. दरम्यान, म्युकरमायकोसीस आजारावरील इंजेक्शनच्या १ लाख व्हायल्स राज्य शासन खरेदी करणार असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले. माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मंत्री श्री. टोपे बोलत होते. आरोग्यमंत्र्यांच्या संवादातील महत्वाचे मुद्दे असे : • राज्यात आतापर्यंत सुमारे १ कोटी ८४ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत मोफत लसीकरण केले जाते.  • सध्या राज्यात कोवॅक्सिन लसीचे ३५ हजार डोस शिल्लक आहेत आणि  ४५ वर्षांवरील सुमारे ५ लाख नागरिक दुसऱ्या डोसच्या (कोवॅक...

आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे,जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव (जिमाका) दि. 11 - आगामी मान्सुन कालावधीत जिल्ह्यात आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास सर्व यंत्रणांनी आपआपसात समन्वय ठेवून परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहन अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी केले आहे.   येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मान्सून पूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरविरसिंह रावळ हे उपस्थित होते. तर जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचेसह विविध विभागांचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.   जिल्हाधिकारी श्री. राऊत पुढे म्हणाले की, महसुल विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा, शोध व बचाव साहित्याची तपासणी करुन सर्व साहित्य सुस्थितीत ठेवावे, मान्सुनकाळात आपत्ती प्रवणक्षेत्रात पुरेसा धान्यसाठा व वितरण करण्याचे नियोजन करावे. अंत्योदय योजनेतंर्गत लाभार्थ्यांना मान्सुन काळात धान्य प...

Dinwarta 11-05-2021

Image
 

राज्यातील पत्रकारांना तातडीने लस देण्यात यावी मंत्री छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी.

पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांचे लसीकरण करणे गरजेचे-छगन भुजबळ मुंबई, दि. १० मे- राज्यात  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यासोबतच राज्यातील सर्व नागरिकांच्या संपूर्ण लसीकरणावरही राज्य सरकार आणि आणि केंद्र सरकारकडून भर दिला जात आहे. आपण ज्या पद्धतीने सर्व आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी, आरोग्य सेवक यांना प्राधान्यांने लस दिली आहे. त्याच पद्धतीने राज्यातील प्रत्येक घडामोडी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मेहनत घेणाऱ्या पत्रकारांना देखील लस देण्यात यावी अशी मागणी आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पत्र पाठवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.... मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे वार्ताहर व प्रतिनिधी हे देखील बातम्यांच्या शोधात संपुर्ण राज्यभर फिरत असतात. प्रत्येक जिल्हा, तालुका व गावाची कोविड-१९ त्या संसर्गाबाबतची सद्यस्थिती विविध माध...

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ पिंप्राळा जळगाव यांच्या वतीने कोरोना आजारावर उपाय योजना आणि मानसिक स्वास्थ्य वरील मार्गदर्शन ऑनलाईन व्याख्यान.

Image
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ पिंप्राळा जळगाव यांच्या वतीने कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी ऑनलाइन व्याख्यान घेण्यात आले ऑनलाइन व्याख्यान तज्ञ डॉक्टरांनी दिले डॉक्टर दिनेश महाजन मनोचिकित्सक जळगाव यांनी कामगारांना covid-19 संबंधी स्वतः व आपल्या परिवाराचा योग्य पद्धतीने कसा बचाव करावा यासंबंधी योग्य माहिती दिली तसेच पूर्ण मूळे व lockdown मुळे बरेच कामगार आर्थिक विवंचनेतून जात आहेत तसेच विविध अडचणींना देखील तोंड देत आहेत त्यामुळे मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहेत या विषयाला अनुसरून मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी आपल्याला सकारात्मक राहणे आपले छंद जोपासणे योगा करणे अशा वेगवेगळ्या टिप्स डॉक्टरांनी दिल्या... यावेळी डॉक्टर सौ संगीता अजय पाटील मेडिकल ऑफिसर नाशिक तसेच डॉक्टर सौ भारती बोराने पुणे या उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आयोजन श्री मिलिंद आर पाटील केंद्रसंचालक जळगाव यांनी केले व आभार सौ स्मिता पाटील यांनी मानले या ऑनलाईन व्याख्यानमालेत साधारण 75 कामगार व कामगार कुटुंबीयांनी लाभ घेतला व त्यांची प्रश्नांची उत्तरे तज्ञ डॉक्टरांकडून समाधानकारक मिळाली.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 21 मेपर्यंत 37 (1) व (3) कलम लागू

जळगाव दि. 6 - जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 7 ते 21 मे, 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) जारी करण्यात आले आहे. या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन कार्यालयाची पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

दस्त नोंदणीसाठी येतांना रॅपिड ॲन्टीजेन तपासणी अहवाल स्वीकारणार.

जळगाव, (जिमाका) दि. 6 - कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने 15 मे, 2021 पर्यंत संपुर्ण राज्यात संचारबंदी लागु केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जळगांव यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 भारतीय साथरोग अधिनियम, 1897 व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये संचार बंदी लागु केली आहे.    त्यानुसार दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी येतांना पक्षकारांना (नागरीकांना) दस्त नोंदणीसाठी जळगांव जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी येताना 48 तासाचे आत RTPCR चाचणी अहवाल निगेटीव्ह असेल तर कार्यालयात दस्त नोंदणीसाठी उपस्थित राहावे असे सुचित करण्यात आले होते. तथापी, सध्याच्या कोविड परिस्थितीचा विचार करता RTPCR चाचणी अहवाल उपलब्ध होण्यास वेळ लागत असल्याने व आरोग्य विभागावर आधीच असलेला ताण आणखी न वाढविता रॅपिड ॲन्टीजेन चाचणीचा अहवाल ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे विजय सु. भालेराव, सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, जळगांव यांनी कळविले आहे. 

Dinwarta 04-05-2021

Image