Posts
Showing posts from November, 2021
अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
- Get link
- X
- Other Apps
By
Dinwarta
-
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (ICC) नवी जबाबदारी मिळाली आहे. आयसीसीच्या क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली यांची निवड करण्यात आली आहे. त्याच्या आधी टीम इंडियाचा माजी कसोटी कर्णधार आणि गांगुलीचा सहकारी खेळाडू अनिल कुंबळे याने हे पद भूषवले होते. कुंबळे जवळपास नऊ वर्षे या पदावर राहिले. क्रिकेट समितीचे काम खेळाच्या अटी आणि नियमांचे निरीक्षण करणे आहे. अनिल कुंबळेने या पदावर तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता आणि त्यापेक्षा जास्त काळ ते पदावर राहू शकत नव्हेत. त्यामुळे त्यांना हे पद सोडावे लागले. गांगुली यापूर्वी आयसीसी क्रिकेट समितीमध्ये निरीक्षक पदावर होता. गांगुलीने भारतासाठी एकूण 113 कसोटी, 311 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 7212 कसोटी आणि 11363 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. गांगुलीच्या खात्यात 32 कसोटी आणि 100 एकदिवसीय विकेट्स आहेत.
रोज कोमट पाणी पिणाऱ्यांनो एकदा वाचा ! बघा यामुळे शरीरात काय काय घडत आहे.आजच जाणून घ्या..
- Get link
- X
- Other Apps
By
Dinwarta
-
शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य ठेवल्याने शरीर हायड्रेटे राहते. शरीरातील पाणी हे आपले चयापचय सुदृढ ठेवते. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कोमट पाणी पिल्यामुळे श रीराची घा ण साफ होते. कोमट पाणी पिण्यामुळे, शरीरातील विषारी द्रव मूत्रमार्गे बाहेर पडतात. सकाळी कोमट पाण्याचे सेवन केल्यास शरीर शुद्ध होते. पाणी तापवल्यानंतर त्याची चव बदलते म्हणून अनेकजण कोमट पाणी पिण्याचं टाळतात. आरोग्यासाठी कोमट पाणी उपयुक्त आहे. दिवसातून किमान तीन वेळा कोमट पाणी पिण्याची सवय लावून घेतल्यास आजारांपासून दूर राहता येतं. आयुर्वेदात पाण्याच्या तापमानातून बहुतांश रोगांवर उपचार केले जातात. कोमट पाणी पिल्यामुळे शरीराची घा ण साफ होते. याशिवाय हे रक्त स्वच्छ करण्यासही मदत करते. ते शरीराची त्वचा तजेलदार करते आणि कोरड्या त्वचेत आद्रता निर्माण करते. नियमितपणे कोमट पाणी पिण्यामुळे शरीरात पाण्याचे संतुलन राहते, ज्यामुळे मुरुमांचा त्रा स कमी होतो आणि त्वचेचे सौंदर्यही टिकते. सर्दी आणि सायनसपासून त्र स्त असलेल्यांना कोमट पाण्यासापासून आराम मिळतो. एकंदरितच, कोमट पाण्याचे बरेच फा-यदे असल्यानं त्याचा ...