Posts

Showing posts from September, 2021

Dinwarta 28-09-2021

Image
 

Dinwarta 21-09-2021

Image
 

“श्री साईबाबा विश्वस्त संस्था शिर्डी”, अध्यक्षपदी कोपरगाव चे राष्ट्रवादी चे आमदार आशुतोष काळे यांची संस्थानच्या अध्यक्षपदी तर जगदीश सावंत यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.यांची नियुक्ती!

शिर्डी : श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळ सदस्यांच्या नावांना अखेर कायदेशीर मान्यता प्राप्त झाली आहे. राज्य सरकारने आज दिनांक 16/9/2021 रोजी मुंबईत राजपत्राद्वारे शिर्डी नगरपंचायतीच्या पदसिद्ध पदासह बारा विश्वस्तांची नावे जाहीर केली आहेत. कोपरगावचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवं तरुण आमदार आशुतोष काळे यांची संस्थानच्या अध्यक्षपदी तर जगदीश सावंत यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संगमनेर काँग्रेस कार्यकर्ते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय, वकील संघाचे अध्यक्ष ॲड.सुहास आहेर यांचाही विश्वस्त मंडळात समावेश करण्यात आला आहे. मागील वर्षी राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यापासूनच शिर्डीच्या जगप्रसिद्ध श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त निवडीचा विषय चर्चेत होता . सध्या संस्थानचे कामकाज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या देखरेखीखाली नियुक्त समिती पाहत आहे. त्यामुळे संस्थानच्या विश्वस्त मंडळाची निवड लवकरात लवकर व्हावी असाही दबाव उच्य न्यायालयाकडून सरकारवर होता. त्यातच न्यायालयाच्या आदेशान्वये निवड प्रक्रिया राबवावी लागल्याने त्यातही मोठा विलंब झाला. मध्यंतरी विश्वस्...

Dinwarta 14-09-2021

Image
 

जिल्ह्यात 23 सप्टेंबरपर्यंत 37 (1) (3) कलम जारी

जळगाव, (जिमाका) दि. 8 - जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 23 सप्टेंबर, 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) जारी करण्यात आले असून तसे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी निर्गमित केले आहे. या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन कार्यालयाची पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. मात्र जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांचेकडील दि. 13 ऑगस्ट, 2021 मधील अटी लागू राहतील, असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.

Dinwarta 07-09-2021

Image
 

उंटावद तालुका यावल येथे लसीकरणाला गावातून उस्फूर्त प्रतिसाद...

Image
उंटावद गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी सरपंच -श्री.छोटू भगवान भिल,उपसरपंच सौ.भावना शशिकांत पाटील तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष मा.श्री. शशिकांत पाटील आणि किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी  डॉ.सौ.मनीषा महाजन यांच्या विशेष प्रयत्नांमुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या गावातच लस देण्याची अत्यंत व्यवस्थित नियोजन उंटावद येथील प्राथमिक शाळेत करण्यात आले होते . संपुर्ण जगासह देशात थैमान घातलेल्या कोव्हीड १९ (कोरोना) या महामारीपासून बचावासाठी संपुर्ण देशभर मोठ्या प्रमाणात लसिकरण होत असुन आरोग्य यंत्रणा अहो रात्र कार्येरत आहे तर किनगाव प्राथमीक आरोग्य केंन्द्रा अंतर्गत येणाऱ्या उंटावद या गावाची १०० टक्के लसिकरणाकडे वाटचाल सुरू असुन आज पर्येंत ८० टक्के लसिकरण येथे झाले आहे तर लवकरच उंटावद गाव हे १०० टक्के लसीकरण होईल यात शंका नाही तसेच ग्रामस्थांचाही लसीकरणाला उस्फुर्त प्रतीसाद मिळत असल्याचे यावेळी डाँ.मनिषा महाजन यांनी सांगीतले  उंटावद येथील ग्रामस्थ किनगाव प्राथमीक आरोग्य केंन्द्रात जाऊन लसीकरण करून घेत होते व नागरीकांचा लसिकरणाबाबत प्रतिसाद पाहता वैद्यकिय आधीकार...