Posts

Showing posts from June, 2020

जिल्ह्यात 111 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण.

जळगाव  : जिल्ह्यात 111 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून एकुण कोरोबाधीतांची संख्या 3082 झाली आहे. जिल्ह्यात  एकूण 111 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात  जळगाव शहर-55 ; जळगाव ग्रामीण- 8; भुसावळ-17; एरंडोल-8; पारोळा- 1, यावल-3; चोपडा-1; जामनेर 3,धरणगाव-6 पाचोरा 1,बोदवड 4 व रावेर 4 असे कोरोनाबाधीत आढळुन आले आहेत.

जिल्ह्यात आज पुन्हा 117 कोरोना पॉझिटिव्ह.

Image
जळगाव : जिल्ह्यात 117 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून एकुण कोरोबाधीतांची संख्या 2971  झाली आहे. जिल्ह्यात गुरुवारी एकूण 117 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात भडगाव 21 , जळगाव शहर-54 ; जळगाव ग्रामीण- 3; भुसावळ-6; एरंडोल-1; पारोळा- 4, यावल-10; चोपडा-3; जामनेर 2, अमळनेर-4; धरणगाव-1 व रावेर 8 असे कोरोनाबाधीत आढळुन आले आहेत.

जिल्ह्यात आज पुन्हा 170 कोरोना बाधित रुग्ण.

Image
जळगाव :जिल्ह्यात आज नवीन 170 कोरोना बाधित रूग्ण आढळले. जिल्ह्यात बाधित रूग्णाची संख्या 2757 इतकी झाली आहे. बुधवारी आढळून आलेल्या अहवालानुसार जळगाव शहर 42, जळगाव ग्रामीण 10, भुसावळ 11, अमळनेर 7, चोपडा 6, पाचोरा 10, भडगाव 2, धरणगाव 5, यावल 8, एरंडोल 2, जामनेर 10, रावेर 19, पारोळा 22, चाळीसगाव 5 , मुक्ताईनगर 8, बोदवड 2, इतर जिल्ह्यातील 1 असे एकूण 170 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 2000 पार , नव्याने १३५ रूग्ण आढळले.

जळगाव  – जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या 2020 इतकी झाली असुन आज नव्याने 135 रूग्ण आढळुन आले आहे. यात जळगाव शहरात 21, जळगाव ग्रामीण 5,भुसावळ 11, अमळनेर 16, चोपडा 23, पाचोरा 3, भडगाव 1, धरणगाव 8, यावल 6, एरंडोल 8, जामनेर 12, रावेर 8, पारोळा 13 अशा रूग्णांचा समावेश आहे.

Dinwarta 16-06-2020

Image

भाजपचे माजी खासदार जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचे निधन.

Image
जळगाव: रावेर लोकसभा भाजपचे मतदारसंघाचे माजी खासदार तसेच रावेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा भाजपचे विद्यमान जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ माधव जावळे यांचे आज निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 60 वर्षाचे होते. दोन वेळा खासदार आणि दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या कुटुंबात आई, पत्नी एक मुलगी दोन मुले असा परिवार आहे.त्यांच्या आकस्मिक निधनाने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारीमध्ये एकच शोककळा पसरली आहे. हरिभाऊ यांचे 3 जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता. त्यांना उपचारासाठी मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते . त्यांनी मधुकर सहकारी साखर कारखाना न्हावी तालुका यावलचे चेअरमनपद देखील भूषवले आहे.

जळगांव जिल्ह्यात आज पुन्हा आढळले 76 कोरोना बाधीत . जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची एकुण संख्या झाली 1804.

  जळगाव :  आज जिल्ह्यात एकूण 76 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक 23 रूग्ण चोपडा तालुक्यातील तर याच्या खालोखाल 14 रूग्ण जळगाव शहरातील आहेत. याच्या सोबत भुसावळ, रावेर व पारोळा प्रत्येकी 7 जळगाव ग्रामीण-1अमळनेर-1धरणगाव-3 यावल-4 एरंडोल-5 जामनेर-1 मुक्ताईनगर-3 अशा रूग्णांचा समावेश आहे.

जळगाव जिल्ह्यात आज पुन्हा 75 कोरोना बाधित.

जळगाव : जिल्ह्यात रविवारी पुन्हा 75 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आतापर्यंत 1728 रुग्णसंख्या झाली आहे. पॉझिटीव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 15, जळगाव ग्रामीण 2, भुसावळ 6, अमळनेर 6, पाचोरा 3, धरणगाव 4, यावल 3, एरंडोल 8, जामनेर 3 , रावेर 10, पारोळा 10, चाळीसगाव 1, बोदवड 2, अन्य जिल्ह्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात पुन्हा 75 कोरोनाबाधित आढळले.

Image
जळगाव । जळगाव जिल्ह्यात शनिवारी पुन्हा 75 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून आतापर्यंत 1653 रुग्णसंख्या झाली आहे. पॉझिटीव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 6, जळगाव ग्रामीण 7, भुसावळ 2, अमळनेर 4, चोपडा 16, भडगाव 3, धरणगाव 6, यावल 17, एरंडोल , जामनेर , मुक्ताईनगर प्रत्येकी 1, रावेर 5, पारोळा 6 यांचा समावेश आहे.

जळगाव जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी पदी अभिजीत राऊत यांची नियुक्ती.

जळगाव : जळगाव शहरासह जिल्हाभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्हाधिकारी व जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या ढिसाळ कारभारामुळे सवञ संतापाची लाट उसळली होती. त्यातच जिल्हा रुग्णालयात कोरोना रूग्ण नेहते नामक वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती या प्रकरणाची वरिष्ठांनी दखल घेऊन तात्काळ रुग्णालयातील दोषींवर कार्यवाही केली. तसेच जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे हे देखील कोरोना ला आळा घालण्यात अपयशी ठरल्याने त्यांची उचल बांगडी करुन 2013 बॅच चे आय.ए.एस. अधिकारी असलेले अभिजित राऊत यांनी आज जळगांव चे नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

जळगांव जिल्ह्यात आज पुन्हा एकुण 130 कोरोना बाधीत रुग्ण आढळुन आले.

जळगाव:  आज जिल्ह्यात 130 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून यामुळे सलग तिसर्‍या दिवशी रूग्ण संख्येने 100 गाठली असून या विषाणूचा संसर्ग मोठ्या गतीने होत असल्याचे दिसून आले आहे.आज जिल्ह्यात एकूण 130 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक 22 रूग्ण धरणगाव शहरातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच्या सोबत रावेर-21,जळगाव-20 जामनेर-18,चोपडा, जळगाव ग्रामीण व भुसावळ प्रत्येकी 5,भडगाव व यावल प्रत्येकी 2,पाचोरा-3,पारोळा-9,बोदवड-4,एरंडोल 1असे रूग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आज नव्याने 114 कोरोनाचे रूग्ण आढळले

Image
जळगाव – जिल्ह्यात आज नव्याने 114 रूग्ण आढळुन आले आहेत. यात जळगाव शहरात 9, भुसावळ 16, अमळनेर 39, धरणगाव 3, यावल 5, एरंडोल 5, जामनेर 11, जळगाव ग्रामीण 4, पारोळा 21, बोदवड 1 असे एकुण 114 रूग्ण आढळले.  आत्तापर्यंत एकुण 1395 रूग्ण झाले.  

वाढदिवशीच झाला मृत्यू, धक्कादायक! कोरोनानं घेतला देशात पहिला आमदाराचा बळी

Image
चेन्नई, 10 जून : अनबालागन यांची प्रकृती रविवारी अचानक खालावली. याआधी त्यांना ऑक्सिझनवर ठेवण्यात आले होते. त्यांना रेला इन्स्टिट्यूट अँड मेडिकल सेंटर रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारपासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. अनबालागन हे चेन्नई पश्चिम जिल्ह्यात द्रमुक सचिव होते. कोरोना विषाणूंमुळे एखाद्या लोकप्रतिनिधीच्या मृत्यूची ही पहिली घटना आहे. जे अनबालागन हे द्रविड़ मुन्नेत्र कड़गम (DMK) पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. मुख्य म्हणजे कोरोनाच्या संकटात लोकांना मदत करण्यासाठी जे अनबालागन विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होते. एवढेच नाही तर त्यांनी पक्षाच्या 'ओंदरीनाओव्हॉम कॅम्पेआग्न' (Ondrinaivom Campaiagn) मध्ये सक्रिय सहभाग घेतला होता.गेल्या आठवड्यात जे अनबालागन यांना कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अनबालागन यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मात्र त्यांची प्रकृती बिघडली. शुक्रवारी द्रमुकचे प्रमुख एमके स्टॅलि...

जळगाव जिल्ह्यात आणखी 116 कोरोना बाधित रूग्ण आढळले.

जळगाव  :जळगाव जिल्ह्यात आज एका दिवसात तब्बल 116 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील 24, भुसावळ 05, अमळनेर 03, चोपडा 21,भडगाव 01, पाचोरा 01, धरणगाव 08, यावल 07,एरंडोल 10 तसेच जामनेर 09,जळगाव ग्रामीण 03, रावेर 01,पारोळा 14,मुक्ताईनगर 03, बोदवड 06 रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 1281 इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

या तारखेला होणार मुसळधार पाऊस - कोकणासह राज्यात पाऊस

Image
स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, कर्नाटक किनारपट्टी आणि केरळनंतर गेल्या दोन दिवसांत मान्सूनने दक्षिणेकडे कर्नाटक, तामिळनाडूचा बहुतेक भाग, रायलसीमा आणि दक्षिण किनारपट्टी आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्ये तडाखा दिला. ईशान्य भारतात, मान्सून पुढील दोन-तीन दिवसांत चांगलाच बरसण्याची शक्यता आहे. तर कोकण, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील उर्वरित भागात पुढे जाईल. तर मिळालेल्या माहितीनुसार, जूनच्या पहिल्या आठवड्यात देशात मान्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा 71 टक्के जास्त झाला आहे. यात मध्य भारत आणि केरळ यांचं सर्वाधिक योगदान आहे.      भारतीय हवामान विभाग (आयएमडी) च्या मते, येत्या 24 तासात बंगालच्या उपसागरात कमी-दाबाचं क्षेत्र तयार होऊ शकतं. त्यामुळे दक्षिण-पश्चिम मॉन्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. हवामानात असाच बदल राहिला तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणासह देशातील बर्‍याच भागात पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर, येत्या दोन दिवसांत मॉन्सून बंगालच्या उपसागरासह, ईशान्येकडील राज्यं, सिक्कीम, ओडिशाचा काही भाग आणि गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये पुढच्या दोन दिवसांत होण्य...

24 तासांत रेकॉर्ड ब्रेक 9987 नवीन रुग्णांची नोंद, तरी देशासाठी एक आनंदाची बातमी

Image
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात 1 लाख 29 हजार 971 सक्रीय प्रकरणं आहेत. तर, 7466 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 29 हजार 214 रुग्ण निरोगी झाले आहे. यासह भारताचा रिकव्हरी रेट 48.46% आहे. त्यामुळं भारतासाठी ही चांगली बाब आहे.    गेल्या 24 तासांत भारतात 9987 नवीन रुग्ण आढळून आले तर 266 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 2 लाख 66 हजार 598 झाला आहे. मात्र असे असले तरी भारतासाठी ही चिंतेची बाब नाही आहे. याचं कारण आहे भारताचा रिकव्हरी रेट.

जळगाव जिल्ह्यात नवीन 56 कोरोना बाधित आढळले

Image
जळगाव जिल्ह्यात दिवसें दिवस कोरोना बाधित रुग्णांची लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. सोमवारी 56 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत 1165 रुग्णांची संख्या झाली आहे. यात जळगाव शहर 4, भुसावळ 19, चोपडा 3, धरणगाव 9, यावल 5, जामनेर 13, रावेर 1,पारोळा2, असे एकूण 56 कोरोना बाधित रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा ९०० पार;आज ३६ कोरोना बाधित रूग्ण आढळुन आले.

Image
जळगाव- जिल्ह्यात आज नव्याने 36 कोरोना बाधित रूग्ण आढळुन आले असुन रूग्ण संख्या 907 इतकी झाली आहे. तर जळगाव आणि भुसावळ या दोन्ही ठिकाणी 200 पेक्षा अधिक रूग्ण आढळुन आले असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली. आज नव्याने 36 रूग्ण आढळुन आले असुन त्यात जळगाव शहर 7, भुसावळ 7, अमळनेर 4, भडगाव 1, यावल 1, एरंडोल 2, जामनेर 3, जळगाव ग्रामीण 1, रावेर 5, पारोळा5  अशा रूग्णांचा समावेश आहे. जळगाव व भुसावळने पार केला 200 चा आकडा  जिल्ह्यात आत्तापर्यंत जळगाव शहरात 206 आणि भुसावळमध्ये 205 अशी रूग्ण संख्या झाली असुन अमळनेरात 143, चोपडा 46, पाचोरा 28, भडगाव 79, धरणगाव 18, यावल 31, एरंडोल 17, जामनेर 17, जळगाव ग्रामीण 28, रावेर 52, पारोळा 19, चाळीसगाव 8, मुक्ताईनगर 7 आणि दुसर्‍या जिल्ह्यातील 3 रूग्ण आहेत.

आज आणखी ३८ रूग्ण जिल्ह्यात आढळले.

जळगाव – जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असुन आज पुन्हा नव्याने 38 रूग्ण आढळुन आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 800 इतकी झाली आहे. कोरोना बाधित आढळलेल्यांमध्ये जळगाव शहर 3, भुसावळ 18, रावेर 10, मुक्ताईनगर 2 तर चोपडा, भडगाव, एरंडोल, जामनेर, जळगाव ग्रामीण येथे प्रत्येकी एक रूग्ण आढळुन आला आहे.

जळगाव जिल्ह्यात 24 नवीन कोरोना रुग्ण; एकूण संख्या 762

जळगाव :  जिल्ह्यातील 120 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी 96 अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर 24 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगाव ग्रामीण येथील 5, जळगाव शहर 5 , भुसावळ 4, अमळनेर 1, भडगाव 5, यावल 1, जामनेर 1 रावेर येथील 2 जणांचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णाची संख्या 762 झाली आहे.