जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा ९०० पार;आज ३६ कोरोना बाधित रूग्ण आढळुन आले.

जळगाव- जिल्ह्यात आज नव्याने 36 कोरोना बाधित रूग्ण आढळुन आले असुन रूग्ण संख्या 907 इतकी झाली आहे. तर जळगाव आणि भुसावळ या दोन्ही ठिकाणी 200 पेक्षा अधिक रूग्ण आढळुन आले असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.
आज नव्याने 36 रूग्ण आढळुन आले असुन त्यात जळगाव शहर 7, भुसावळ 7, अमळनेर 4, भडगाव 1, यावल 1, एरंडोल 2, जामनेर 3, जळगाव ग्रामीण 1, रावेर 5, पारोळा5  अशा रूग्णांचा समावेश आहे.
जळगाव व भुसावळने पार केला 200 चा आकडा
 जिल्ह्यात आत्तापर्यंत जळगाव शहरात 206 आणि भुसावळमध्ये 205 अशी रूग्ण संख्या झाली असुन अमळनेरात 143, चोपडा 46, पाचोरा 28, भडगाव 79, धरणगाव 18, यावल 31, एरंडोल 17, जामनेर 17, जळगाव ग्रामीण 28, रावेर 52, पारोळा 19, चाळीसगाव 8, मुक्ताईनगर 7 आणि दुसर्‍या जिल्ह्यातील 3 रूग्ण आहेत.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत