या तारखेला होणार मुसळधार पाऊस - कोकणासह राज्यात पाऊस

स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, कर्नाटक किनारपट्टी आणि केरळनंतर गेल्या दोन दिवसांत मान्सूनने दक्षिणेकडे कर्नाटक, तामिळनाडूचा बहुतेक भाग, रायलसीमा आणि दक्षिण किनारपट्टी आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्ये तडाखा दिला. ईशान्य भारतात, मान्सून पुढील दोन-तीन दिवसांत चांगलाच बरसण्याची शक्यता आहे. तर कोकण, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील उर्वरित भागात पुढे जाईल. तर मिळालेल्या माहितीनुसार, जूनच्या पहिल्या आठवड्यात देशात मान्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा 71 टक्के जास्त झाला आहे. यात मध्य भारत आणि केरळ यांचं सर्वाधिक योगदान आहे.     



भारतीय हवामान विभाग (आयएमडी) च्या मते, येत्या 24 तासात बंगालच्या उपसागरात कमी-दाबाचं क्षेत्र तयार होऊ शकतं. त्यामुळे दक्षिण-पश्चिम मॉन्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. हवामानात असाच बदल राहिला तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणासह देशातील बर्‍याच भागात पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर, येत्या दोन दिवसांत मॉन्सून बंगालच्या उपसागरासह, ईशान्येकडील राज्यं, सिक्कीम, ओडिशाचा काही भाग आणि गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये पुढच्या दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत