Posts

Showing posts from April, 2020

जळगाव जिल्ह्यात आणखी पाच कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव  – नुकत्याच प्राप्त झालेल्या कोरोना तपासणी अहवालानुसार जिल्ह्यातील संशयित रुग्णांपैकी 56 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 51 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर पाच व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत. कोरोना बाधित व्यक्तीमध्ये भुसावळ येथील 15 वर्षीय मुलगा, अमळनेर येथील 55 वर्षीय, पाचोरा येथील 56 वर्षीय, तर जळगाव येथील 30 व 57 वर्षीय पुरूषांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 37 झाली आहे. यापैकी दहा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. एक रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे. आता प्राप्त झालेल्या निगेटिव्ह अहवालातील 51 व्यक्तींपैकी 16 व्यक्ती या अमळनेरच्या, 6 व्यक्ती पाचोरा, 4 व्यक्ती भुसावळच्या तर उर्वरित जळगावच्या आहेत. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे.

जळगाव जिल्ह्यात आणखी सात रूग्ण कोरोना बाधित आढळले .

जळगाव, दि .२८ : – जिल्ह्यातील कोरोना संशयित रूग्णांपैकी 54 व्यक्तीचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. त्यापैकी *सात* रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर 47 संशयित रूग्णाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोना बाधित सात रूग्णांपैकी चार रूग्ण अमळनेर चे असून जळगाव, पाचोरा व भुसावळ च्या प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. हे सर्व रूग्ण यापूर्वी आढळून आलेल्या कोरोना बाधित रूग्णाच्या संपर्कातील आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या *एकतीस* इतकी झाली आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे.

जळगांव जिल्ह्यात आजपासून तोंडाला मास्क लावणे सक्तीचे नाहीतर होणार पाचशे रुपये दंड. -जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे .

जळगाव,ता. 26 : – जिल्ह्यात वाढलेले कोरोना बाधित रुग्ण पाहता जिल्ह्यात प्रत्येकाने तोंडाला मास्क लावणे सक्तीचे आहे, मास्क न लावल्यास पाचशे रुपये दंड करण्यात येईल,  असा इशारा आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिला . जिल्ह्यात कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी एन पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांच्यासह नोडल अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील चार रुग्णांचे कोरोणा संसर्ग तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क अथवा स्वच्छ धुतलेला रुमाल बांधणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर...

परिस्थिती पाहून लॉकडाऊनचं काय करायचं ते ठरवू: उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. लॉकडाऊनबाबत काय करायचं आहे याचा विचार परिस्थिती पाहूनच ३ मे नंतर घेण्यात येईल, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केलं. मुंबई: राज्यातील ग्रामीण भागात काही प्रमाणात उद्योगधंद्यांना मुभा दिली आहे. त्याचा अहवाल रोज माझ्याकडं येत आहे. आज संध्याकाळीही मी आढावा घेणार आहे. परिस्थिती पाहूनच लॉकडाऊनचं काय करायचं याबाबतचा निर्णय घेऊ, असं  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  म्हणाले.

जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्य सेतू हे ॲप डाऊनलोड करावे जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 25 - कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी शासन अनेक उपाययोजना राबवत आहे. त्याच अनुषंगाने केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने आरोग्य सेतू हे ॲप तयार केले आहे. या ॲपमध्ये कोरोना विषाणू अनुषंगाने सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. कोरोना विषाणू बाधितांच्या ट्रेसिंगसाठी महत्वाचे ॲप असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी विशेषत: स्मार्टफोन धारकांनी हे ॲप डाऊनलोड करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी केले आहे. या ॲपद्वारे ॲप डाउनलोड करणारा व्यक्ती कोरोना बाधित असलेल्या किती लोकांच्या संपर्कात आला या विषयाची माहिती मिळते तसेच ॲप डाऊनलोड करणाऱ्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला तर या व्यक्तीच्या संपर्कात कोण कोण आले याची सर्व माहिती या ॲपद्वारे मिळते. हे ॲप सुरुवातीला डाऊनलोड करणाऱ्याचे आरोग्यविषयक तपासणी करते. आरोग्य विषयक विशेषत: कोरोना विषयक काही प्रश्न विचारले जातात त्याच्या उत्तरांना आपल्याला चूक की बरोबर उत्तरावर टिक करावे लागते. तसेच ॲपमध्ये सामाजिक अंतर कशा पद्धतीने ठेवायचे, हात कशा पद्धतीने धुवायचे, तोंडावर रुमाल कशा पद्धतीने लावायचा याविषयीची ...

जळगांव जिल्ह्यात आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या 14 इतकी झाली

*जळगावात आणखी तीन कोरोना बाधित रुग्ण आढळले.* येथील कोविड रुग्णालयात 21 एप्रिल रोजी कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब घेतलेल्यांपैकी तीन रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहे. या तीनही रुग्णांचे अहवाल *पॉझिटीव्ह* आले आहे. या तीन रुग्णांमध्ये मलकापूर, जि. बुलढाणा येथील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर भुसावळ येथील 43 वर्षीय महिला व अमळनेर येथील 43 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या 14 इतकी झाली असून यापैकी एक रुगण बरा होऊन घरी गेला आहे. तर तीन रुग्णांचा मृत्यु झाला असून उर्वरित 10 रुग्ण कोरोना संसर्ग कक्षात उपचार घेत आहेत. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैंरे यांनी दिली आहे.

Dinwarta 21-04-2020

Image

Dinwarta 15-04-2020

Image

Dinwarta 07-04-2020

Image