वृत्तसंस्था - नवीदिल्ली : सोमवारी महाराष्ट्रात 2005, तमिळनाडुत 536, गुजरातमध्ये 366, राजस्थानात 305, दिल्लीत 299, मध्यप्रदेशात 259, उत्तरप्रदेशात 141, पश्चिम बंगालमध्ये 148, बिहारमध्ये 103, जम्मू-कश्मीरमध्ये 106, कर्नाटकात 99, आंध्रप्रदेशात 52, ओडिशात 48 रुग्णांची नोंद झाली. ही आकडेवारी covid19india.org आणि राज्य सरकारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात 1 लाख 1 हजार 139 कोरोनाग्रस्त आहेत. 58 हजार 802 रुग्णांवर उपचार सुरू असून 39 हजार 173 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे 3163 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 1142 झाली आहे. सोमवारी 4629 नवीन रुग्ण वाढले. आतापर्यंत 39 हजार 233 रुग्ण बरे झाले आहेत. सोमवारी महाराष्ट्रात रुग्णांची संख्या 35 हजारांच्या पुढे गेली आहे. सलग दुसऱ्या दिवशी 2 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, रुग्णांचा बरा होण्याचा दर वाढून 38.29% झाला आहे. देशात 1 लाख लोकसंख्येमागे 7.1 कोरोना रुग्णांची संख...