आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह, कोरोनाबाधीतांची संख्या पोहचली ४१ वर

जळगाव– येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी एकूण 47 व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. त्यापैकी 43 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर चार व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

या चार व्यक्तीमध्ये अमळनेर येथील एक, जोशीपेठ, जळगाव येथील एक तर पाचोरा येथील दोन व्यक्तीचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 41 इतकी झाली आहे. त्यापैकी बारा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत