“ज्ञानोबा – तुकोबा” च्या मंत्रात “शिवाजी – संभाजी” हे दोन महामंत्र गुंजले अन अविस्मरणीय सोहळा पाहून धन्य झाले जळगावकर ..
ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमेला जळगाव नगरीचेचे ग्रामदैवत प्रभू श्रीराम यांच्या श्रीराम मुक्ताई पालखीचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होते वारकरी-धारकरी संगम म्हणजे भक्ती आणि शक्तीचा संगम हा सोहळा. वारकरी सांप्रदाय म्हणजे पंढरपूर. तुकोबा, ज्ञानोबांची वारी, आणि धारकरी म्हणजे श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान शिवाजी संभाजी रक्तगटाची ललकारी” जेंव्हा परकीय आक्रमण आले होते, देश, धर्म, सांप्रदाय नष्ट होत चालले होते. या उभ्या महाराष्ट्राला संपूर्ण भारत देशाला, कोणीच वाली न्हवते तेंव्हा छत्रपती शिवाजीराजे भोसले जन्माला आले आणि त्यांनी अपार पराक्राम गाजवून, परकीयांना धूळ चारून देव, देश आणि धर्माच्या पाठीशी उभे राहून सर्वांचे रक्षण केले, साधुसंताना अभय दिले, ज्यांच्यामुळे पंढरीचा पाडुरंग, तुळजापूरची आई भवानी माता परकीय जाचातून मुक्त झाली याच शिवरायांचा नामघोष. त्यांच्या पराक्रमाची गाथा, त्यांचा धारकरी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या रूपाने जळगाव पंढरपूर दिंडीत सहभागी झाला होता. जळगावात प्रथमच वारकरी-धारकरी संगमाचे आयोजन करण्यात आले होते यासाठी पांडे डेअरी चौक भगवे ध्वज, रांगोळ्...