राज्यस्तरीय बैठकीत जिल्हा वार्षीक सर्वसाधारण योजनेसाठी ४२५ कोटींची तरतूद !
पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने जिल्ह्यास मिळाला ६८ कोटीं रुपयांचा वाढीव निधी. नाविन्यपूर्ण योजनेच्या कामांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कौतुक ! जळगाव दि. २१ (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा वार्षीक योजना सर्वसाधारण २२-२3 करीता ३५७ कोटी ४९ लक्ष रूपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपूराव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिरिक्त ६७ कोटी ५० लक्ष रूपयांचा निधी वाढवून दिला आहे. त्यामुळे पुढील वर्षासाठी जळगाव जिल्ह्याकरिता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) साठी ४२५ कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, या संदर्भात आज ऑनलाईन पद्धतीने झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जळगाव जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण मधिल कामांचे तसेच कार्यकारी समितीचे सदस्य व विशेष निमंत्रितांच्या नेमणुका याबाबत उपमुख्यमंत्र्यांकडून...