Posts

Showing posts from 2025

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

Image
जळगाव  – नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला. आत्माराम धना लोंढे असे जळगाव शहर उप विभागातील  वरिष्ठ तंत्रज्ञाचे (वायरमन) नाव आहे. जळगाव एसीबीच्या पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या लाच प्रकरणातील तक्रारदार हे डॉक्टरचे वडील आहेत. त्यांनी त्यांच्या मुलाच्या नावे नवीन वीज मीटर घेण्यासाठी वायरमन लोंढे यांची भेट घेत लागणाऱ्या कागदपत्रांबाबत विचारणा केली होती. वायरमन लोंढे यांनी डॉक्टरच्या वडिलांना नवीन वीज मीटर बसवण्यासाठी चार हजार रुपयाची मागणी केली होती. त्यावेळी त्यांनी वायरमन लोंढे यांना मागणी प्रमाणे चार हजार रुपये दिले होते. त्यानंतर देखील लोंढे यांनी वीज मीटर बसवून देण्याचे काम केले नाही. त्यामुळे डॉक्टरचे वडील अर्थात तक्रारदार यांनी वायरमन लोंढे यांना याबाबत विचारणा केली. त्यावर त्यांना पुन्हा दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली. पुन्हा लाच देण्याची तक्रारद...