Posts

Showing posts from May, 2022

जैन इरिगेशनचे 31 मार्च 2022 ला संपलेल्या चौथ्या तिमाही व आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर, चौथ्या तिमाहीत कंपनीच्या एकत्रित उत्पन्नात 16.2 टक्क्यांची वाढ

Image
Pressnote -  जळगाव दि. 30 (प्रतिनिधी)- जगातील ठिबक आणि तुषार सिंचनाचे संच उत्पादन करणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या व भारतातील प्रथम क्रमांकाची कंपनी जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडने संचालक मंडळाच्या बैठकीत आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाही तसेच चालू आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षणापूर्वीच्या आर्थिक निकालास मंजूरी दिली. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 30 मे रोजी पार पडली. आर्थिक वर्ष 2021-22 च्या आर्थिक वर्षात चौथ्या तिमाहीमध्ये एकत्रीत उत्पन्नात 16.2 टक्के वाढ दर्शविली आहे. ह्या आर्थिक वर्षात एकूण उत्पन्न 7119.5 कोटी रुपये आहे जे गतवर्षी याच काळात केवळ 5666.9 कोटी रुपये इतके होते. कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी कंपनीच्या वाटचालीविषयी संवाद साधला. *चौथ्या तिमाहिच्या (4QFY22) एकत्रित निकालाचे वैशिष्ट्ये :* · सर्व प्रमुख व्यवसाय विभागांमध्ये सकारात्मक वाढ नोंदवून वार्षिक आधारावर महसूल 16.2% ने वाढला. · विदेशी बाजारपेठेतील चांगल्या मागणीमुळे हाय-टेक कृषी निविष्ठा उत्पादन विभागाने वार्षिक 6.8% ची वाढ नोंदवली. · सर्व उत्पादनांच्या साखळीमध्ये प्लॅस्टिक वि...

रक्ताभिषेक(रक्तदान) करीत महाराजांचा राज्याभिषेक

Image
उन्हाळ्यात सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासत असतो व त्यातही जिल्हा रुग्णालय जळगाव हे गोरगरीब जनतेचे आशास्थान जिल्हाभरातून आलेल्या रुग्णांना इथल्या रक्तपेढीतून रक्त उपलब्ध न झाल्यास मोठा आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास सोसावा लागतो हीच बाब ध्यानात घेऊन गडकिल्ले  सर्वधनासाठी झटणाऱ्या राजा शिवछत्रपती परिवाराच्या मावळ्यांनी हेरून 6 जून रोजी राज्याभिषेक दिनी मोहीम आयोजित केली होती पण रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांनी रक्ताच्या कमतरते अभावी रुग्णांचे हाल होत असल्याचे सांगितल्याने तात्काळ नियोजन करीत काल 29 मे रोजीच मोहिमेचे आयोजन केले  त्याला जिल्हाभरातून परिवाराच्या मावळ्यांनी साथ देत रक्तपेढीत येऊन  44 रक्त पिशव्या  रक्ताचे दान करून 8 दिवस अगोदरच छत्रपतींना राज्यभिषेकासाठी रक्ताभिषेक केला  रक्तदान मोहिमेत साधारण पुरुषच अग्रभागी असतात पण या मोहिमेत परिवाराच्या 8 रणरागिणी रक्तदानासाठी पुढे आल्या होत्या हे विशेष सर्वानी स्वेच्छेने रक्तदान करून महाराजांना अभिवादन केले  तरी पण त्या स्वतःहून रक्तदानासाठी पुढे आल्या हे कौतुकास्पद आहे इतर महिलांनी पण रक्तदान...