जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 22 - सध्या संपुर्ण जगात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट सुरु असल्याने सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने शासनाने काही अटी व मार्गदर्शक तत्वे निर्गमित केलेले आहे. त्याचे तंतोतंत पालन होण्यासाठी त्याचप्रमाणे नागरीकांनी सण, उत्सव, थोरामोठ्यांच्या जयंती, पुण्यतिथी, धार्मिक दिंडी अशा स्वरुपांचे कार्यक्रम घेवु नये. याकरीता संपूर्ण जळगाव जिल्ह्यात 22 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून 6 मे, 2021 च्या मध्यरात्रीपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (3) लागू करण्यात येत आहे. असे अप्पर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. खालील कृत्यांना राहणार बंदी शस्त्र, सोटे, भाले, तलवारी, बंदुका, सुरे, लाठया व काठया किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तु घेऊन फिरणे, अंग भाजुन टाकणारा कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ किंवा द्रव्ये बरोबर घेऊन फिरणे, दगड अगर इ. अस्त्र किंवा शस्त्र सोडावयाची अगर फेकावयाची हत्यारे, साधने इ. जमा...