जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 26- कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रतिबंधक उपययोजना म्हणून उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांनी एरंडोल नगरपरिषद हद्दीत 28 मार्च 2021 रोजी रात्री 12 पर्यंत जनता कर्फ्यु पालन करण्याचे आवाहन केले असून शहरात कडक निर्बंध लागू केले आहेत. या कालावधीत सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार बंद राहतील. किराणे दुकाने, इतर अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने बंद राहतील. अपवादात्मक परिस्थीतीत रेशन दुकानाबाबत काही वेळ तहसिलदार यांनी ठरवून घ्यावी. किरकोळ भाजीपाला, फळे खरेदी विक्री केंद्रे बंद राहतील. शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, खाजगी कार्यालये बंद राहतील. मान्यता प्राप्त विद्यापीठाची पुर्व नियोजित परिक्षा असल्यास त्याचे तहसिल कार्यालयाकडून पास घेवून आयोजन करता येईल. सर्व हॉटेल/ रेस्टॉरंट (अत्यावश्यक सेवेसाठी होम डीलाव्हरी/ पार्सल देणारे हॉटेल वगळता ) बंद राहतील. सभा, मेळावे, बैठका, धार्मिक स्थळे, सांस्कृतिक, धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील. शॉपींग मॉल, मार्केट, बार्बर शॉप, स्पा,...