जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

 जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत



जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशांनुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शुक्रवार , शनिवार व रविवार अशा तीन दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढीस लागली आहे . यामुळे जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे . तसेच सार्वजनीक कार्यक्रमांवर बंदी लादण्यात आली आहे . तरीही कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेता पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांनी शुक्रवार , शनिवार आणि रविवार या तिन दिवशी जनता कर्फ्युचे  पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

●  यानुसार जळगावात आता तीन दिवसांचा जनता कर्फ्यु असणार आहे . हा जनता कर्फ्यु 11 मार्च 2021 रोजी रात्री आठ वाजता पासून सुरुवात होऊन 15 मार्च 2021 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत राहणार आहे .

● विविध संघटनेच्या माध्यमातून प्रस्तावावरून हा तीन दिवसीय जनता कर्फ्यु लागू करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लागू केले आहे . हा जनता कर्फ्यु फक्त तीन दिवस राहणार असून नागरिकांनी साठेबाजी करू नये असे आवाहन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती