Posts

Showing posts from March, 2022

लेवा भ्रात्रुमंडळ, पिंपळे सौदागर यांचेतर्फे अण्णासाहेब डॉ जी डी बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगांव यांच्या दत्तात्रय धांडे सभागृहात परिसरातील काही शाळांना लॅपटॉप वाटप

Image
आज दिनांक ३० जानेवारी रोजी *लेवा भ्रात्रुमंडळ, पिंपळे सौदागर* यांचेतर्फे *अण्णासाहेब डॉ जी डी बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगांव यांच्या दत्तात्रय धांडे सभागृहात परिसरातील काही शाळांना लॅपटॉप वाटपाचा* छोटेखानी कार्यक्रम आयोजित करणेत आला. हे संगणक मंडळास *मास्टर कार्ड इंडिया* यांचेकडून *एन्व्हायरमेंट काॅंझर्वेशन असोसिएशन (ईसीए), पुणे* यांचे सहकार्याने २००₹ प्रतिसंगणक हाताळणी फी भरून उपलब्ध झाले आहेत. हे संगणक आवश्यक ती तपासणी व रिफर्बिशिंग करुन व ओएस अपलोड करून खालील शाळा संस्थांना मोफत उपलब्ध करुन देण्यात आले. १) दीपस्तंभ फाऊंडेशन, जळगांव २) जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, गाडेगाव, ता. जामनेर, जिल्हा जळगांव ३) महात्मा गांधी विद्यालय, भादली, जिल्हा जळगांव ४) सौ मी. रा. महाजन प्राथमिक विद्यालय भादली, जिल्हा जळगांव ५) नोबेल फाऊंडेशन, जळगांव,जिल्हा जळगांव ६) स्वयंदीप प्रतिष्ठान, डांभूर्णी, ता. यावल, जिल्हा जळगाव. ७) उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्र, जळगांव. ८) के. डी. भोळे प्रायमरी स्कूल, आसोदा, जिल्हा जळगांव ९) जिल्हा परिषद केंद्र शाळा, नेरीदिगर, ता. जामनेर, जिल्हा जळगांव १०) शक...

रामानंद नगर पोलिसांची चैन स्नॅचिंग या गुन्ह्याला आळा घालण्यासाठी काव्यरत्नावली चौकात नंबर प्लेट नसलेल्या दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची तपासणी मोहीम

Image
जळगाव-24 मार्च रोजी संध्याकाळी सात वाजेपासून जळगावातील गजबजलेल्या काव्यरत्नावली चौकात रामानंदनगर पोलिस स्टेशनचे तपासणी पथक पोलीस निरीक्षक मा.श्री.विजय शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक श्री.गोपाल देशमुख यांच्या नेतृत्वात गाड्यांवर नंबर नसलेल्या दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची तपासणी करून तसेच संबंधित कागदपत्रांची चौकशी करून गुन्ह्याला आळा बसावा यासाठी कार्यरत होते.. रामानंदनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री विजय शिंदे यांच्याशी तपासणी मोहिमेच्या बाबतीत चर्चा करताना लक्षात आलं की चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये विशेषता नंबर नसलेल्या गाड्यांचा वापर होतो आणि मग अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस करण्यात वेळ लागतो ..त्यामुळे गुन्हा होण्याच्या अगोदरच खबरदारीची उपाययोजना म्हणून आणि जळगाव पोलीस अधीक्षक मा.डॉ.प्रवीणजी मुंडे यांच्या सूचनेनुसार अशा प्रकारची तपासणी मोहीम रामानंद नगर पोलिस राबवत होते.  या तपासणी पथकात पोलीस निरीक्षक श्री.विजय शिंदे ,पोलीस उपनिरीक्षक श्री.गोपाळ देशमुख, श्री शिवाजी धुमाळ आणि श्री.पंकज पाटील तसेच रामानंद नगर पोलीस स्टेशच्या इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

मराठी शाळेच्या सुधारणा काम संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे - उपस्थित झालेले 9 प्रश्न

Image
स्वयंदीप प्रतिष्ठानने डांभुर्णी प्राथमिक शाळेच्या सुधारणा कामी आर्थिक योगदान दिलेल्या तसेच जिल्हा परिषद सदस्य तसेच इतर प्रशासकीय अधिकारी ज्यांचे या कामात महत्त्वाचे सहकार्य आहे अशा सर्व मान्यवरांचा पूर्वनियोजित सत्काराचा कार्यक्रम आज म्हणजे 23 मार्च रोजी अकरा वाजता मराठी शाळेत होणार होता ,मात्र या कार्यक्रमाला श्रेय वादाचा रंग देऊन प्रसारमाध्यमात तसेच सर्वसामान्य जनता यांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न होतो आहे.त्याची सत्य व असत्य बाजू काय? हे मांडण्यासाठी ही आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती आणि त्यासंदर्भात खालील 9 मुद्दे. 1)ग्रामपंचायत डांभुर्णीशी संबंधित सरपंच, ग्रामसेवक व शाळेचे मुख्याध्यापक यांना मौखिक व लेखी स्वरूपात सत्कार समारंभाचे माहिती मी स्वतः तसेच लेखी निवेदन डांभुर्णी ग्रामपंचायत सदस्य श्री शुभम विसवे यांनी दिलेली आहे. त्याची पोचपावती देखील आमच्याकडे आहे, तरी अशी कोणतीच माहिती सरपंचांना किंवा ग्रामपंचायतला नाही असे खोटे कारण दाखवून व मुख्याध्यापकांवर दबाव आणून चुकीच्या आशयाचे पत्र देण्याचे व त्या माध्यमातून कार्यक्रम होऊ नये यासाठी दडपशाहीचे धोरण वापरण्याचे काय ...

डांभुर्णी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सुधारणा व गुणवत्ता विकास कामा संदर्भातील- सत्य

Image
स्वयंदीप प्रतिष्ठान या सामाजिक आणि शैक्षणिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातूनच जिल्हा परिषद मराठी शाळेच्या पायाभूत सुधारणा व गुणवत्ता विकास या उपक्रमाला खरी सुरुवात झाली.  स्वयंदीप प्रतिष्ठान संचलित ग्रंथालय व अभ्यासिका च्या उद्घाटनाप्रसंगी दिलेल्या निवेदनात आणि मी स्वतः मांडलेल्या प्रस्ताविकेत (11 सप्टेंबर 2018 ) संरक्षक भिंतीसाठी आदरणीय तत्कालीन जिल्हाधिकारी साहेब श्री किशोर राजे निंबाळकर यांनी स्वतः मदत मागितली होती आणि त्यातूनच जिल्हा नियोजन समितीमधून दहा लाखांची मदत मिळाली आहे ..सोबतच 545000 इतका निधी लोकसहभागातून जमा झाला तसेच स्वयंदीप प्रतिष्ठान ने  स्वखर्चातून शाळा डिजिटल केली. परंतु ही खरी माहिती लपवण्यात आली ,पण सत्य लपत नाही गावातील स्थानिक ग्रामस्थांनी माहिती आहे, परंतु ज्या शिक्षकांच्या आणि मुख्याध्यापकांच्या साक्षीने एवढा मोठा प्रकल्प दानशूर माजी विद्यार्थी यांच्या मदतीने पूर्ण केला त्यांचं साधं नाव घ्यायलाही तयार नाही. मा.जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब आर.जी.पाटील यांच्या माध्यमातून छतासाठी पत्रे मिळाली पण मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना ही माहिती लपवण्...