Posts

Showing posts from August, 2022

वृक्षाचा वाढदिवस करीत वृक्षारोपण मोहीम सम्पन्न

Image
  छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत गड किल्ले सर्वंधन व स्वछता हेच शिवकार्य मानणाऱ्या   राजा शिवछत्रपती परिवाराच्या जळगाव विभागातील मावळ्यांनी सातपुड्याच्या डोंगर रांगेत असलेल्या व व हिरवाई ची शाल अंगावर घेत पहुडलेल्याकिल्ले विजयगडाच्या पायथ्याशी   रविवार 31 जुलै 22 रोजी स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सव व परिवाराच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत वृक्षारोपन व बीज रोपण मोहिमेचे आयोजन वन विभागाच्या सहकार्याने केले होते सदर मोहिमेला जिल्हाभरातून108 मावळे व रणरागिणी उपस्थित होते याप्रसंगी  वड ,पिंपळ ,बेल ,निंब ,शिसम आदी75  देशी वृक्षांचे वृक्षारोपण करून त्यांना ट्री गार्ड लावून संरक्षित करण्यात आले , परिवाराच्या रणरागिणींच्या हस्ते मागील वर्षी लावलेल्या वडाच्या झाडाचा वाढदिवस त्याचे औक्षण करीत व छत्रपतींच्या जयघोषात करण्यात आला , त्रिवेणीमंदिर परिसरात असलेल्या नाल्याचा बांध ढासळून गेला होता त्यामुळे पाण्याचा साठा न होता ते वाहून जात होते त्या बांधात जवळपास 12 ट्रॅकटर माती व मुरूम टाकून त्याची दुरुस्ती करण्यात आली  वृक्ष जगल...