वृक्षाचा वाढदिवस करीत वृक्षारोपण मोहीम सम्पन्न

  छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत गड किल्ले सर्वंधन व स्वछता हेच शिवकार्य मानणाऱ्या   राजा शिवछत्रपती परिवाराच्या जळगाव विभागातील मावळ्यांनी सातपुड्याच्या डोंगर रांगेत असलेल्या व व हिरवाई ची शाल अंगावर घेत पहुडलेल्याकिल्ले विजयगडाच्या पायथ्याशी   रविवार 31 जुलै 22 रोजी स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सव व परिवाराच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत वृक्षारोपन व बीज रोपण मोहिमेचे आयोजन वन विभागाच्या सहकार्याने केले होते सदर मोहिमेला जिल्हाभरातून108 मावळे व रणरागिणी उपस्थित होते याप्रसंगी  वड ,पिंपळ ,बेल ,निंब ,शिसम आदी75  देशी वृक्षांचे वृक्षारोपण करून त्यांना ट्री गार्ड लावून संरक्षित करण्यात आले , परिवाराच्या रणरागिणींच्या हस्ते मागील वर्षी लावलेल्या वडाच्या झाडाचा वाढदिवस त्याचे औक्षण करीत व छत्रपतींच्या जयघोषात करण्यात आला , त्रिवेणीमंदिर परिसरात असलेल्या नाल्याचा बांध ढासळून गेला होता त्यामुळे पाण्याचा साठा न होता ते वाहून जात होते त्या बांधात जवळपास 12 ट्रॅकटर माती व मुरूम टाकून त्याची दुरुस्ती करण्यात आली  वृक्ष जगले तरच आपल्या जगातील अस्तित्वाला अर्थ राहील त्यासाठी फक्त वृक्षारोपण करून  भागणार नाही तर ते जगवले पण पाहिजे व त्यासाठी सर्वानीच आपापल्या परीने तन मन धन खर्च करीत आपला सहभाग नोंदवला पाहिजे असे मनोगत परिवाराचे उप विभाग प्रमुख श्री अमोल पाटील यांनी व्यक्त केले   सदर मोहिमेसाठी चोपडा येथील वन विभागीय अधिकारी श्री समाधान सोनवणे यांनी भोजनाची व्यवस्था केली होती व बांधाच्या दुरुस्ती साठी परिवाराचे मावळे बंटी दादा यांनी ट्रॅकटर व श्री सोनवणे सर यांनी जेसीबी उपलब्ध करून दिले होते  मोहीम यशस्वी होण्यासाठी  महेंद्र राजपूत , विश्राम तेले ,  सागर पाटील किरण शिरसाठ , पंकज शिंदे  योगेश ठाकरे शांताराम  पाटील व वन विभागाचे कर्मचारी  यांनी मेहनत घेतली

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत