महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची निवडणूक बिनविरोध.अध्यक्ष जगन्नाथ शिंदे तर सचिव पदी अनिल नावंदर पुनश्च निवड.
डोंबिवली केमिस्ट च्या वतीने सत्कार मुंबई - द महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची कार्यकारिणी आणि सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यात 2020 ते 2023 या कालावधी साठी निवडणूक अधिकारी दिलीप कदम यांनी निवडणूक निकाल जाहीर केला. अध्यक्ष जगन्नाथ शिंदे आप्पासाहेब तर सचिव पदी अनिल भाऊ नावंदर यासह सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. डोंबिवली केमिस्ट असोसिएशनचे वतीने जगन्नाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. डोंबिवली असोसिएशनचे वतीने सचिव विलास शिरुडे, राजेश कोरपे, निलेश वाणी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी कल्याण कोळसेवाडी येथे जाऊन सत्कार केला. राज्य केमिस्ट संघटनेची कोविड १९ च्या पाश्वभूमीवर प्रशासनाच्या निर्देश प्रमाणे ऑनलाइन मिटिंग घेण्यात आली. संघटनेचा निवडणूक कार्यक्रम यापूर्वी जाहीर करण्यात आला होता. निवडणूक अधिकारी म्हणून दिलीप कदम, सुनिल भाई छाजेड यांनी कामकाज पाहिले. प्रत्येक जागेसाठी एकच अर्ज आल्याने आजच्या आयोजित सर्वसाधारण सभेत नावे जाहीर करण्यात आली. अध्यक्ष जगन्नाथ शिंदे कल्याण, उपाध्यक्ष मुकूंद दुबे चंद्रपूर, अरुण बरकसे बीड, सचिव अनिल नावदंर खामगाव, सह सचि...