समाजातील सर्वच दुःख आपण दूर करू शकत नाही मात्र समाजातील काही घटकांचे दुःख दूर करण्याचा छोटासा प्रयत्न मात्र नक्की करू शकतो. याच भावनेने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून श्री निलेश सांबरे विविध सामाजिक कार्य करत आहेत. त्याच माध्यमातून सौ.दर्शना हरेश पष्टे हिच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम हात, पाय, व पोलिओ ग्रस्तांना कॅलिपर्स, कुबड्या, व्हीलचेअर व आदी साहित्य देण्याचा प्राथमिक शिबीराचे आयोजन पंचायत समिती हॉल शहापुर येथे करण्यात आले होते.यावेळीं सुमारे १४८ दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली. त्यातील १०८ दिव्यांग बांधवाना कृत्रिम हात, पाय, कॅलिपर्स, कुबड्या, व्हीलचेअर व आदी साहित्य देण्यात येणार आहे. या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शहापुर पंचायत समितीच्या सभापती यशोदाताई आवटे, उपसभापती जगन्नाथजी पष्टे, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष दशरथजी तिवरे साहेब, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंकरजी खाडे साहेब,दिलीप (आबा) अधिकारी साहेब, सामाजिक कार्यकर्ते श्री बबन दादा हरणे,माजी उपसभापती पद्माकर वेखंडे,मा.सभापती सोनल शिंगे,पं.स.सदस्या दीक्षाताई लकडे,इतर पं.स.सद...