आदरणीय श्री.प्रतापरावजी पाटील यांचा 56 वा वाढदिवस आणि 56 सायकलिस्ट सोबत आपल्या वयक्तिक 30 हजार किलोमीटर सायकलिंगची संकल्पपूर्ती..
4 ऑगस्ट ह्या आपल्या 56 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मा.श्री.प्रतापराव पाटील यांनी जळगावातील विविध सायकलिंग ग्रुपला 56 कि.मी सायकलिंग साठी आवाहन केले यातून 56 सायकलिस्ट मित्रांनी प्रतिसाद देत पहाटे पाच वाजता गणपती नगर मधील , गणपती मंदिराजवळून सायकलिंग ला सुरुवात केली.. शिरसोली -वावडदा- म्हसावदकडे जाऊन तिथून परत येताना वावडद्याच्या अमृतवेल रेस्टॉरंट मध्ये साहेबांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम सर्व सायकलिंग ग्रुप सोबत संपन्न झाला .
त्यांनतर 8 वाजता शिरसोली ग्रामपंचायतचे सरपंच श्री.प्रदीप रावसाहेब पाटील यांच्या माध्यमातून वाढदिवासनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.. त्यात सुरुवातीला सर्व सायकलिस्ट ग्रुपसाठी अल्पोपहार आणि मग मा.श्री.प्रतापराव पाटील यांचा वाढदिवस व 30 हजार किमी ची सायकलिंग पूर्ण केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.तसेच महापालिकेतील मा.डॉ.विजय घोलप (SR) ,शिक्षक श्री.सुनील चौधरी (SR),मा.श्री.स्वप्नील मराठे (SR) आणि श्री.संभाजी पाटील(SR) यांचे ही सायकलिंग मधील SR पात्रता पूर्ण केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
याशिवाय सायकलिंग ग्रुप चे सदस्य व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक मा.डॉ.किशोर पवार तसेच नुकतीच PHD संपादन करणारे प्रा.डॉ.दलाल सर आणि प्रा.डॉ.शशांक झोपे सर यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला.या दरम्यान जळगांव सायकलिस्ट चे अध्यक्ष मा.श्री.महेश सोनी व किशोर नागराज पाटील यांनी मा.श्री. प्रतापराव पाटील यांना वाढदिवासनिमित्त फोटो फ्रेम भेट दिली.
पुढील नियोजन म्हणजे ह्या सर्व सायकलिस्ट ग्रुप चे आवडते ठिकाण असलेले रामदेव टेकडी येथे उपवनसंरक्षक मा.श्री.होशिंग साहेब आणि FRO मा.श्री.समाधान पाटील आणि वन विभातील स्टाफ यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सायकलिस्ट ग्रुप साठी प्रताप पॉईंट असलेले रामदेव टेकडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. नंतर मा.श्री.इरफान पिंजारी (रॉबिन हूड आर्मी) यांच्या माध्यमातून NH 6 वरील बॅट विक्री करणारे तसेच इतर कामे करणाऱ्यांच्या लहान मुलांसमवेत केक कापून व त्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यानंतर श्री प्रतापराव पाटील यांच्या दालनात जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाढदिवासनिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या..तसेच ग्रामीण भागासाठी काम करणाऱ्या स्वयंदीप प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेचा अहवाल श्री.प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या शुभहस्ते आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आला.
आपल्या छंदाचा सुयोग्य वापर प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासोबतच आपल्या कार्यक्षेत्रातील विविध विकास कामाची प्रभावी अंमलबजावणी अशी सुरेख सांगड घालणारे एक कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी म्हणजेच आदरणीय श्री.प्रतापरावजी पाटील होय..
सर आपल्या पुढाकाराने जळगाव मध्ये एक मोठा सायकलिंग ग्रुप उभा राहिला त्यामुळे विविध क्षेत्रातील मान्यवर यातून जोडले गेले आणि यातून अनेक सकारात्मक निर्णय तसेच सर्वांचे आरोग्य असे अनेक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदे या माध्यमातून होताना दिसत आहेत..
आपल्या जन्मदिनी आपणास मराठा सेवा संघ जळगाव स्वयंदीप प्रतिष्ठान डांभुर्णी तसेच दीपस्तंभ फाउंडेशन जळगाव यांच्याकडून आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आपणास निरामय आरोग्य लाभो.. आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो..
Comments
Post a Comment