शहापुर पंचायत समिती येथें जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत दिव्यांग बांधवांसाठी आयोजित केलेले शिबीर संपन्न..!!
समाजातील सर्वच दुःख आपण दूर करू शकत नाही मात्र समाजातील काही घटकांचे दुःख दूर करण्याचा छोटासा प्रयत्न मात्र नक्की करू शकतो. याच भावनेने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून श्री निलेश सांबरे विविध सामाजिक कार्य करत आहेत. त्याच माध्यमातून सौ.दर्शना हरेश पष्टे हिच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम हात, पाय, व पोलिओ ग्रस्तांना कॅलिपर्स, कुबड्या, व्हीलचेअर व आदी साहित्य देण्याचा प्राथमिक शिबीराचे आयोजन पंचायत समिती हॉल शहापुर येथे करण्यात आले होते.यावेळीं सुमारे १४८ दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली. त्यातील १०८ दिव्यांग बांधवाना कृत्रिम हात, पाय, कॅलिपर्स, कुबड्या, व्हीलचेअर व आदी साहित्य देण्यात येणार आहे.
या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शहापुर पंचायत समितीच्या सभापती यशोदाताई आवटे, उपसभापती जगन्नाथजी पष्टे, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष दशरथजी तिवरे साहेब, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंकरजी खाडे साहेब,दिलीप (आबा) अधिकारी साहेब, सामाजिक कार्यकर्ते श्री बबन दादा हरणे,माजी उपसभापती पद्माकर वेखंडे,मा.सभापती सोनल शिंगे,पं.स.सदस्या दीक्षाताई लकडे,इतर पं.स.सदस्य,अपर्णाताई खाडे,व्यापारी मंडळांचे सुरेंद्र तेलवणे साहेब,रोटरी क्लबचे तालुकाध्यक्ष शेखरजी तेलवणे साहेब,दिलीपजी भोपतराव,जिजाऊ संस्थेचे सचिव केदारजी चव्हाण व आदी प्रमुख मान्यवर,पत्रकार,नागरिक,दिव्यांग बांधव,जिजाऊ संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मनःपुर्वक आभार.
आपला,
हरेश रघुनाथ पष्टे.
नगरसेवक,शहापुर नगरपंचायत.
Comments
Post a Comment