Posts

Showing posts from February, 2022

शेतकऱ्यांच्या पोटखराब जमीन वाहितीखाली आणण्यासाठी आणि त्याबाबत सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याकामी जिल्हा प्रशासनाचे आवाहन पोटखराब वर्ग अ मधील पोट नियमात सुधारणा..

 जळगाव दि 16 (जिमाका वृत्तसेवा):    अनेक शेतकऱ्यांनी पोटखराब जमिनी सुधारणा करून लागवडीखाली आणलेल्या आहेत परंतु त्याबाबत अधिकार अभिलेखात नोंदी न घेतल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता त्यासाठी अधिकार अभिलेखात पोटखराब जमिनी लागवडीयोग्य झाले बाबत नोंदी घेण्यासाठी कार्यपध्दती विहित करुन त्या अनुषंगाने क्षेत्रीय महसूली अधिकारी व प्राधिकारी यांना दिशानिर्देश जारी करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी  कळविले आहे. त्यासाठी जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तहसील स्तरावर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे   पोटखराब जमिन वर्ग अ मध्ये शासनाकडील क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.३६/ज-१ अ, दिनांक २९/०८/२०१८ च्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) (सुधारणा) नियम, २०१८ नुसार महाराष्ट्र जमीन महसूल ( जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम, १९६८ च्या नियम 2 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत:- १. तलाठी यांनी संबंधित गावातील सर्व सर्व्हे / गट नंबर निहाय पोटखराब वर्ग (अ) ची माहिती गाव नमुना नंबर ७/१२...

Dinwarta 08-02-2022

Image