डांभुर्णी येथे स्वयंदीप प्रतिष्ठान आयोजित ई-श्रम कार्ड नोंदणी व वाटप तसेच स्वयंदीप प्रतिष्ठान संचालित- सेतू सुविधा केंद्राचे उदघाटन मा.आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व उपस्थीत मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले..
दिनांक- 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता गावातील मुख्य चौकात प्रातिनिधिक स्वरूपात 10 लाभार्थ्यांना ई-श्रम कार्ड प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले तसेच गावातील सर्वसामान्य नागरिकांच्या ई-श्रम कार्ड नोंदणी साठी शिबीर (कॅम्प) चेही मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उदघाटन करून सेवेचा प्रारंभ डांभुर्णी गावापासून करण्यात आला तसेच पुढे हे शिबिर उंटावद,चिंचोली, डोणगाव ,कोळन्हवी आडगाव -कासारखेडा ह्या पंचकृषितील गावामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे .. या कार्यक्रमाची प्रस्तावना स्वयंदीप प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव-संदीप पाटील (सोनवणे) यांनी केले व ई-श्रम कार्ड हे असंघटित क्षेत्रातील कामगार तसेच मजूर यांच्यासाठी कसे उपयुक्त आहे याचे उद्दिष्ट काय याबाबतीत स्पष्टीकरण देऊन ग्रामीण भागात असंघटित क्षेत्रात येणाऱ्या मजुरांची विशेषतः ह्या गटात मोडणाऱ्या महिलांची संख्या मोठया प्रमाणात आहे म्हणून ग्रामीण भागात असा उपक्रम जास्त संयुक्तिक ठरतो असे प्रतिपादन केले .. ह्या कार्यक्रमात नानासाहेब आर.जी पाटील ,कासारखेडा सरपंच श्री.भागवत पाटील,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री राम पवार ,स्वराज्य ग्रुपचे...