खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे जगी जे दीन पददलित तया जाऊन उठवावे... या पूज्य साने गुरुजींच्या प्रार्थनेचा प्रत्यय जिल्हा महिला व बालविकास कार्यालय जळगाव येथे आला..
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे जगी जे दीन पददलित तया जाऊन उठवावे...
या पूज्य साने गुरुजींच्या प्रार्थनेचा प्रत्यय जिल्हा महिला व बालविकास कार्यालय जळगाव येथे आला..
कोरोनामुळे दोन्ही पालक दगावलेल्या मुलांसाठी महिला व बाल विकास विभाग -महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत 18 वर्षाखालील मुला-मुलींसाठी काही योजना राबविल्या जात आहेत आणि ह्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे..
जळगाव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून अशा अनाथ झालेल्या मुलांचा शोध घेणे, त्यांना या योजनांचा लाभ मिळवून देणे यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मा.श्री.विजयसिंग परदेशी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी संबंधित यंत्रणा,आरोग्य विभाग,प्रसार माध्यमे,स्वतःची शोध पथके या सर्वांच्या माध्यमातून या सर्व पीडित (अनाथ) बालकांचा शोध घेतला.एवढेच नव्हे तर या शासकीय योजने सोबत ह्या 18 वर्षाखालील निरागस बालकांना या दुःखातून आणि वेदनेतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी आमच्या दीपस्तंभ (मनोबल) या संस्थेशी संपर्क केला.त्यांच्या मनातून हे दुःख दूर करून त्यांना नवीन उमेद आणि प्रेरणा देण्यासाठी समुपदेशन करण्याची व्यवस्था देखील तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी आम्हाला आग्रह केला.
आपल्या इतर जबाबदाऱ्या सांभाळत स्वतः जातीने या उपक्रमात सक्रिय राहिले .. या सर्व अनाथ मुलांचे माध्यमिक शिक्षण गुणवत्तापूर्ण होण्यासाठी तसेच त्यांना भविष्यातील करिअरच्या संधी व शालेय स्तरीय स्पर्धा परीक्षा यांचे मार्गदर्शन दीपस्तंभ च्या माध्यमातून वेळोवेळी कसे उपलब्ध करून देता येईल यासाठी आम्हाला विचारणा केली ..एवढंच नव्हे तर शासकीय योजनांची सर्व संबंधित कागदपत्र एकाच वेळेत आणि एकाच ठिकाणी पूर्ण करून घेता यावीत यासाठी त्यांनी एक स्वतंत्र यंत्रणा कार्यालयात सुरू केली होती ..या पीडित बालकांना बँकेच्या खात्यासाठी वणवण फिरावं लागू नये म्हणून बँकेचे संबंधित कर्मचारी देखील खाते उघडण्यासाठी आपल्याच कार्यालयात बोलावून घेतले ..
थोडक्यात कोणत्याच कामासाठी या अनाथ ,पीडित बालकांना शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज पडू नये याची दक्षता मा.श्री विजयसिंह परदेशी घेताना दिसले ..शासकीय लाभ मिळवून देणे ,योजनेची अंमलबजावणी करणे हे त्यांचे कर्तव्यच हे मी समजू शकतो , परंतु त्यापुढे जाऊन त्यांनी मुलांच्या मानसिकतेचा आणि त्यांच्या वेदनेचा सर्वार्थाने विचार करून त्यावर फुंकर घालण्यासाठी जे जे काही करता येइल ते सर्व करण्याचा प्रयत्न कटाक्षाने केला...
एक संवेदनशील मन आणि कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी आज या समुपदेशनाच्या निमित्ताने मला पहावयास मिळाला ...
आदरणीय श्री.विजयसिंह परदेशी सर आणि संपूर्ण जिल्हा महिला व बालविकास कार्यालय यांचे मी आभार मानतो आणि आपल्या पुढील कार्यास भरभरून शुभेच्छा देतो..
धन्यवाद
संदीप निंबाजी पाटील (सोनवणे)
दीपस्तंभ फाउंडेशन आणि स्वयंदीप प्रतिष्ठान
उपसंपादक दिनवार्ता
Comments
Post a Comment