लेवा भ्रात्रुमंडळ, पिंपळे सौदागर यांचेतर्फे अण्णासाहेब डॉ जी डी बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगांव यांच्या दत्तात्रय धांडे सभागृहात परिसरातील काही शाळांना लॅपटॉप वाटप

आज दिनांक ३० जानेवारी रोजी *लेवा भ्रात्रुमंडळ, पिंपळे सौदागर* यांचेतर्फे *अण्णासाहेब डॉ जी डी बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगांव यांच्या दत्तात्रय धांडे सभागृहात परिसरातील काही शाळांना लॅपटॉप वाटपाचा* छोटेखानी कार्यक्रम आयोजित करणेत आला.
हे संगणक मंडळास *मास्टर कार्ड इंडिया* यांचेकडून *एन्व्हायरमेंट काॅंझर्वेशन असोसिएशन (ईसीए), पुणे* यांचे सहकार्याने २००₹ प्रतिसंगणक हाताळणी फी भरून उपलब्ध झाले आहेत. हे संगणक आवश्यक ती तपासणी व रिफर्बिशिंग करुन व ओएस अपलोड करून खालील शाळा संस्थांना मोफत उपलब्ध करुन देण्यात आले.
१) दीपस्तंभ फाऊंडेशन, जळगांव
२) जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, गाडेगाव, ता. जामनेर, जिल्हा जळगांव
३) महात्मा गांधी विद्यालय, भादली, जिल्हा जळगांव
४) सौ मी. रा. महाजन प्राथमिक विद्यालय भादली, जिल्हा जळगांव
५) नोबेल फाऊंडेशन, जळगांव,जिल्हा जळगांव
६) स्वयंदीप प्रतिष्ठान, डांभूर्णी, ता. यावल, जिल्हा जळगाव.
७) उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्र, जळगांव.
८) के. डी. भोळे प्रायमरी स्कूल, आसोदा, जिल्हा जळगांव
९) जिल्हा परिषद केंद्र शाळा, नेरीदिगर, ता. जामनेर, जिल्हा जळगांव
१०) शकुंतला विद्यालय जळगांव
११) दादासाहेब दामू पांडू माध्यमिक विद्यालय, सुनसगाव जिल्हा जळगांव.
याविषयी माहिती देताना श्री पिंपळे यांनी उपस्थितांना सुचवले कीं, हे संगणक *परिसरात डिजीटल साक्षरता व ग्रामीण शैक्षणिक गुणवत्ता* वाढावी यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून देण्यात आले आहेत. सर्व *लाभार्थ्यांनी त्यांचा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा* अशा तऱ्हेने वापर करायचा आहे. सर्व लाभार्थ्यांनी या *संगणक वापरामुळे झालेल्या फायद्याविषयी दर सहा महिन्यांनी एकदा मंडळास कळवायचे आहे.* संगणक वापराच्या अन्य अटी सर्व लाभार्थ्यांना लिखित देण्यात आल्या आहेत. त्यांचे सर्वांनी पालन करायचे आहे.
याचदरम्यान श्री पिंपळे यांनी मंडळाच्या *साप्ताहिक मूल्य शिक्षण वर्ग व ग्रामीण शालेय गुणवत्ता सुधार* उपक्रमांची माहिती दिली व सर्वांनी जास्तीत जास्त *मुलांना ऑनलाईन मूल्य शिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी प्रचार व प्रसार करावा* असे आवाहन केले.

श्री पिंपळे यांनी महाराष्ट्रातील जळगांव, बुलढाणा, नाशिक, पुणे, सोलापूर आणि गडहिंग्लज अशा ६ जिल्ह्यातील एकूण २८ ते ३० शाळा / संस्थांना हे संगणक वाटप केले जाणार असलेचे सांगितले. त्यापैकी कमितकमी ८० + संगणक जळगांव जिल्ह्यात वाटण्यात येत आहे.

श्री पिंपळे यांनी *ग्रामीण शालेय गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत शिक्षक व स्वयंसेवक यांचेसाठी ४ दिवसीय निवासी प्रशिक्षण केंद्र व जिल्ह्यातील महिला बचत गट प्रोत्साहन योजना* या दोन योजनांसाठी आर्थिक सहाय्य / प्रायोजक हवा आहे. त्याबाबत उपस्थितांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.

श्री यजूवेंद्र महाजन यांनी मंडळाच्या सर्व समाजांना सामावून घेण्याच्या धोरणाचे कौतुक केले व मंडळास गरजेनुरुप सहकार्य करणेचे आश्वासन दिले.
*श्री राजू मामा भोळे यांनी मंडळाच्या उपक्रम / कार्याबद्दल गौरवोद्गार काढले व मंडळाच्या शालेय शिक्षक प्रशिक्षण शिबीर व महिला बचत गट प्रोत्साहन योजनेसाठी आवश्यक ते आर्थिक बळ मिळवून दिले जाईल* असे आश्वासन दिले.
श्री रविंद्र चोधरी, श्री संदीप पाटील (स्वयंदीप प्रतिष्ठान), श्री अरुण बोरोले यांनी आपापले मनोगत व्यक्त करीत उपक्रमाचे कौतुक केले.

उपक्रमास पुढील मान्यवर उपस्थित होते -
** श्री पुरुषोत्तम पिंपळे - लेवा भ्रात्रुमंडळ पिंपळे सौदागर पुणे.
** श्री हर्षल जावळे, लेवा शुभमंगल प्रमुख, भालोद
** आमदार सुरेशदादा (राजू मामा) भोळे
** डॉ बावने सर बेंडाळे महिला महाविद्यालय
** श्री रविंद्र चौधरी - LCCIA
** श्री अरुणदादा बोरोले
*दीपस्तंभ प्रतिनिधी*
** श्री यजूवेंद्र महाजन सर
** ठाकरे सुरेखा दिलीप व अन्य
*जि.प.उ. प्रा. शाळा गाडेगाव प्रतिनिधी*
** श्री रमेश वामनराव पाटील.
** श्री रमेश मेघराज पवार
*म. गांधी विद्यालय भादली व सौ मी रा महाजन प्राथमिक विद्यालय भादली प्रतिनिधी*
** श्री किशोर दत्तात्रय रडे
** श्री सुनील अरविंद नारखेडे
*नोबेल फाऊंडेशन प्रतिनिधी*
** श्री जयदीप पाटील 
** श्री राजेन्द्र सुमेरसिंग पाटील
*स्वयंदीप प्रतिष्ठान प्रतिनिधी*
** श्री संदीप पाटील
*उडान दिव्यांनी प्रशिक्षण केंद्र* प्रतिनिधी -
** सौ हर्षाली प्रवीण चौधरी 
** सौ सीमा प्रदीप गाजरे
*के डी भोळे प्राथमिक विद्यालय*- प्रतिनिधी
** सौ विद्या मुकेश कोल्हे
** सौ पौर्णिमा उल्हास भोळे
**श्री नितीन दत्तात्रय वाणी
*जि. प. केंद्र शाळा, नेरीदिगर, ता. जामनेर, जिल्हा जळगांव* प्रतिनिधी
** सौ विजया मिलिंद येवले
** सौ नीता प्रकाश वराडे
** श्री प्रकाश वराडे
*शकुंतला विद्यालय जळगांव* - प्रतिनिधी 
** सौ राजश्री महाजन
याप्रसंगी  श्री पिंपळे यांनी आदरणीय राजू मामा भोळे, बेंडाळे महिला महाविद्यालय व्यवस्थापन, श्री रविंद्र चौधरी, श्री हर्षल जावळे, श्री अरुण बोरोले, श्री यजूवेंद्र महाजन सर, ॲड भारती ढाके, श्रीमती सीमाताई गाजरे, सर्व लाभार्थी संस्था प्रतिनिधी, व उपस्थितांचे आभार मानले. लाभार्थ्यांनी आपापल्या मनोगतात उपक्रमाचे भरभरून कौतुक केले व संगणक भेटीबद्दल आभार मानले.

एक दिवस आधी (दि. २९ मार्च) मंडळातर्फे असाच संगणक वाटप उपक्रम यांवर रावेर परिसरातील शाळांसाठी भारत विद्यालय न्हावी येथे आयोजित केला होता.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत