डांभुर्णी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सुधारणा व गुणवत्ता विकास कामा संदर्भातील- सत्य
स्वयंदीप प्रतिष्ठान या सामाजिक आणि शैक्षणिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातूनच जिल्हा परिषद मराठी शाळेच्या पायाभूत सुधारणा व गुणवत्ता विकास या उपक्रमाला खरी सुरुवात झाली.
स्वयंदीप प्रतिष्ठान संचलित ग्रंथालय व अभ्यासिका च्या उद्घाटनाप्रसंगी दिलेल्या निवेदनात आणि मी स्वतः मांडलेल्या प्रस्ताविकेत (11 सप्टेंबर 2018 ) संरक्षक भिंतीसाठी आदरणीय तत्कालीन जिल्हाधिकारी साहेब श्री किशोर राजे निंबाळकर यांनी स्वतः मदत मागितली होती आणि त्यातूनच जिल्हा नियोजन समितीमधून दहा लाखांची मदत मिळाली आहे ..सोबतच 545000 इतका निधी लोकसहभागातून जमा झाला तसेच स्वयंदीप प्रतिष्ठान ने स्वखर्चातून शाळा डिजिटल केली.
परंतु ही खरी माहिती लपवण्यात आली ,पण सत्य लपत नाही गावातील स्थानिक ग्रामस्थांनी माहिती आहे, परंतु ज्या शिक्षकांच्या आणि मुख्याध्यापकांच्या साक्षीने एवढा मोठा प्रकल्प दानशूर माजी विद्यार्थी यांच्या मदतीने पूर्ण केला त्यांचं साधं नाव घ्यायलाही तयार नाही. मा.जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब आर.जी.पाटील यांच्या माध्यमातून छतासाठी पत्रे मिळाली पण मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना ही माहिती लपवण्यात का आली ,काही दैनिकात दिलेल्या बातमीत सुद्धा हाच प्रकार झाला तो आपण स्वतः तपासू शकता.
स्वयंदीप प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्हा परिषद डांभुर्णी मराठी शाळेच्या सुधारणेसाठी काम केलं पाहिजे ही खरी संकल्पना स्वयंदीप प्रतिष्ठानचे प्रेरणास्थान श्री संजय दत्तात्रय सोनवणे यांची होती. कारण स्वयंदीप ने लोकसहभागातून गावात ग्रंथालय अभ्यासिकेची यशस्वी उभारणी केली होती .
तसाच प्रकल्प स्वयंदीप प्रतिष्ठानने मराठी शाळेसाठी करावा आणि त्याची सुरुवात स्वतः एक लाखाचा निधी देऊन संजय दादांनी केली.
या अगोदर ग्रामपंचायत ने कोणतेही काम शाळेसाठी योजिले देखील नव्हते फक्त एक सामाजिक संस्था एवढं काम करू शकते हे न पचणारे होते ,परंतु आम्ही तत्कालीन सरपंच यांना सोबत घेऊनच या कामाची सुरुवात केली परंतु लोकसहभागातून जमा झालेला निधी स्वयंदिप च्या खात्यावर न टाकता परस्पर एका शिक्षकाच्या आणि स्वतः सरपंच यांच्या खात्यात टाकण्यात आला .त्याचा हिशोब अजून कुणालाच दिलेला नाही .तसेच 10 लक्ष एवढा निधी हा संरक्षण भीतीसाठी मिळाला होता परंतु गेट आणि फक्त दर्शनी भागातच भिंत बांधण्यात आली आणि शाळेच्या आजूबाजूला आणि मागील बाजूस तारेच कुंपण घालण्यात आले आहे.संरक्षण भिंती ऐवजी कुंपण का घालण्यात आले तसेच त्या 10 लाख निधीचा लेखा जोखा अजून कुणालाच माहिती नाही असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
अनेक दानशूर व्यक्तींनी (सविस्तर यादी) दिलेली आहे. यथाशक्ती स्वयंदीपच्या लोकसहभागाच्या कार्याला मदत केली आणि त्यातून जवळपास सहा लाखांचा निधी जमा झाला आणि खऱ्या अर्थाने काम उभे राहिले..
Comments
Post a Comment