रक्ताभिषेक(रक्तदान) करीत महाराजांचा राज्याभिषेक

उन्हाळ्यात सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासत असतो व त्यातही जिल्हा रुग्णालय जळगाव हे गोरगरीब जनतेचे आशास्थान जिल्हाभरातून आलेल्या रुग्णांना इथल्या रक्तपेढीतून रक्त उपलब्ध न झाल्यास मोठा आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास सोसावा लागतो हीच बाब ध्यानात घेऊन गडकिल्ले  सर्वधनासाठी झटणाऱ्या राजा शिवछत्रपती परिवाराच्या मावळ्यांनी हेरून 6 जून रोजी राज्याभिषेक दिनी मोहीम आयोजित केली होती पण रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांनी रक्ताच्या कमतरते अभावी रुग्णांचे हाल होत असल्याचे सांगितल्याने तात्काळ नियोजन करीत काल 29 मे रोजीच मोहिमेचे आयोजन केले  त्याला जिल्हाभरातून परिवाराच्या मावळ्यांनी साथ देत रक्तपेढीत येऊन  44 रक्त पिशव्या  रक्ताचे दान करून 8 दिवस अगोदरच छत्रपतींना राज्यभिषेकासाठी रक्ताभिषेक केला  रक्तदान मोहिमेत साधारण पुरुषच अग्रभागी असतात पण या मोहिमेत परिवाराच्या 8 रणरागिणी रक्तदानासाठी पुढे आल्या होत्या हे विशेष सर्वानी स्वेच्छेने रक्तदान करून महाराजांना अभिवादन केले  तरी पण त्या स्वतःहून रक्तदानासाठी पुढे आल्या हे कौतुकास्पद आहे इतर महिलांनी पण रक्तदानासाठी पुढे महिला रक्तदानात मागे असतात हा समज खोडुन काढावा असे मनोगत   सौ ममता दीघडे सौ विजया पाटील ,सौ शीतल महाजन ,कु मानसी चव्हाण  Dr स्नेहा वाडे यांनी व्यक्त केले व यापुढे पण आम्ही रक्तदान करू असे नमूद केले  मावळ्यांना या प्रसंगी अल्पोपहार व  चहा पानाची व्यवस्था  श्री सचिन हटकर यांच्याकडून करण्यात आली होती  मान्यवरांच्या हस्ते या प्रसंगी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले मोहीम यशस्वी होण्यासाठी मावळे नरेंद्र इंगळे , संदीप बागुल ,नितीन महाजन किशोर पाटील अबरारखान आमिर शेख  Dr दीपक पाटील ,देवकर मॅडम , रविराज राणे स्वप्नील वाणी  यांनी मेहनत घेतली

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत