जळगाव जिल्ह्यात आणखी ३ कोरोना बाधित रूग्ण; एकूण १६०

जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर, पाचोरा, जळगाव येथे स्वॅब घेतलेल्या 48 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 45 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून तीन व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रूग्णांमध्ये अमळनेर येथील एक, जळगावातील दोन रूग्णांचा समावेश आहे. तसेच कोरोना बाधित रूग्णांपैकी आज अमळनेरच्या एक व भुसावळ येथील एक रूग्णाचा मृत्यू झाला आहे. निगेटिव्ह आढळलेले सर्व तपासणी अहवाल पाचोरा येथील आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 160 इतकी झाली असून त्यापैकी वीस रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत