जळगाव जिल्ह्यात आज आणखी 14 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले.

जळगाव- जिल्ह्यातील भुसावळ, जळगाव, पारोळा व चोपडा येथे स्वॅब घेतलेल्या 30 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 16 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 14 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील चार, भुसावळ येथील दहा रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 258 इतकी झाली असून त्यापैकी 45 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत तर तीस कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत