साईधन इंटरप्रायजेसतर्फे पत्रकारांना मास्क वाटप...
जळगाव- कोरोनाचे सर्वत्र थैमान घातले आहे. जिल्ह्यातही कोरोनाबाधीतांचा आकडा 45 वर जावून पोहचला आहे. अशा परिस्थितीत सदैव तत्परतेने वृत्तांकन करणार्या माध्यम प्रतिनिधी, पत्रकारांना शहरातील साईधन इंटरप्रायेजेस तर्फे कामगार दिनाच्या औचित्य साधत मास्कचे वाटप करण्यात आले आहे.
शहरातील धनजंय किर्तने यांची साईधन इंटरप्रायजेस नावाने कंपनी आहे. तसेव व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण मंडळ नावाने शैक्षणिक तसेच सेवाभावी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजयोगी उपक्रम राबवित असतात. सद्यस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लॉकडाऊन असल्याने बचत गटाच्या महिलांच्याही हाताला कुठलेही काम नाही. सामाजिक बांधिलकी जोपासा किर्तने यांनी सदर महिलांना मास्क बनविण्याचे देवून रोजगार उपलब्ध केला. या बचत गटाच्या महिलांनी कॉटनचे मास्क तयार केली आहे. धनंजय किर्तने यांच्यातर्फे कामगार दिनाचे औचित्य साधत शहरातील सर्व वृत्तपत्र कार्यालयात प्रत्यक्ष जावून माध्यम कर्मीना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत अजय पाटील, महेंद्र भावसार, गौरव सोनवणे हे उपस्थित होते.






Comments
Post a Comment