जिल्ह्यात आणखी दहा कोरोना बाधित रूग्ण; एकूण रुग्ण १२४

जळगाव :: जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव, भुसावळ, रावेर, जामनेर येथे स्वॅब घेतलेल्या 78 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 68 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून दहा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

पॉझिटिव्ह आढळलेले रूग्णांमध्ये भुसावळ येथील पाच, चोपडा येथील दोन, अमळनेर येथील एक तर मेहरूण व ममुराबाद (जळगाव ) येथील दोन रूग्ण असे एकूण दहा रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 124 इतकी झाली असून त्यापैकी सोळा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत