जळगाव जिल्ह्यात आज ५ कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण आढळले.एकूण रुग्ण ३५१

जळगाव – जिल्ह्यातील अमळनेर, जळगाव, पाचोरा, भडगाव, धरणगाव, ‘जामनेर येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्ती पैकी 49 व्यक्ती तपासणी अहवाल रात्री उशीरा प्राप्त झाले आहे. त्यापैकी 44 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर पाच व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगावातील 2 तर अमळनेर, भडगाव, धरणगावातील प्रत्येकी 1 व्यक्तीचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्ण संख्या 351 इतकी झाली आहे.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत