जळगाव जिल्ह्यात आज आणखी १५ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले.एकूण रुग्ण ३४६

जळगाव – जिल्ह्यातील जळगाव, भडगाव, पाचोरा, रावेर, शेंदूर्णी, पहूर आदि विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 134 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 119 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 15 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भडगाव येथील 13, सावखेडा, ता. पाचोरा येथील 1 व रावेर येथील 1 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 346 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 133 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहे तर आतापर्यंत 38 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत