होम क्वांरटाईन केलेल्या व्यक्तीबाहेर फिरताना दिसल्यास होणार गुन्हे दाखल.

जळगाव, (जिमाका) दि. 18 - जिल्ह्यात जे नागरिक बाहेर गावावरून आलेले आहेत व ज्यांच्या चौदा दिवसांचा होमक्वारंटाईनचा कालावधी संपलेला नाही. असे नागरिक बेकायदेशीर बाहेर फिरताना दिसल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश गोरक्ष गाडीलकर, अध्यक्ष, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती तथा इंन्सिडंन्ट कमांडर यांनी  संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
  जिल्ह्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, रुग्णांची संख्या नियंत्रित करण्यासाठी व साथीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सर्वस्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून या कालावधीत जे बाहेर गावावरून नागरिक आपल्या जिल्ह्यात आलेले आहे त्यांना 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. परंतु असे निदर्शनात आले की, काही नागरिक त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारलेला असताना सुद्धा घरी न राहता इतरत्र फिरत आहे हे अतिशय गंभीर आहे.
  जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता जे नागरिक बाहेर गावावरून आलेले आहेत व ज्यांच्या चौदा दिवसांचा होमक्वारंटाईनचा कालावधी संपलेला नाही. अशा नागरिकांची अचानक तपासणी करावी. जे नागरिक बेकायदेशीर बाहेर फिरताना दिसतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही श्री. गाडीलकर यांनी दिले आहे.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत