रिकव्हरी रेट वाढून 38.29% वर पोहचला, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख पार

वृत्तसंस्था -  नवीदिल्ली  :  सोमवारी महाराष्ट्रात 2005, तमिळनाडुत 536, गुजरातमध्ये 366, राजस्थानात 305, दिल्लीत 299, मध्यप्रदेशात 259, उत्तरप्रदेशात 141, पश्चिम बंगालमध्ये 148, बिहारमध्ये 103, जम्मू-कश्मीरमध्ये 106, कर्नाटकात 99, आंध्रप्रदेशात 52, ओडिशात 48 रुग्णांची नोंद झाली. ही आकडेवारी covid19india.org आणि राज्य सरकारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात 1 लाख 1 हजार 139 कोरोनाग्रस्त आहेत. 58 हजार 802 रुग्णांवर उपचार सुरू असून 39 हजार 173 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे 3163 जणांचा मृत्यू झाला आहे. 



देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 1142 झाली आहे. सोमवारी 4629 नवीन रुग्ण वाढले. आतापर्यंत 39 हजार 233 रुग्ण बरे झाले आहेत. सोमवारी महाराष्ट्रात रुग्णांची संख्या 35 हजारांच्या पुढे गेली आहे. सलग दुसऱ्या दिवशी 2 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, रुग्णांचा बरा होण्याचा दर वाढून 38.29% झाला आहे. देशात 1 लाख लोकसंख्येमागे 7.1 कोरोना रुग्णांची संख्या आहे. तर केंद्राने आपल्या 50% कनिष्ठ कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास सांगितले आहे. लॉकडाउननंतर 33% कर्मचार्‍यांसह कार्यरत होते.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत