जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशांनुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शुक्रवार , शनिवार व रविवार अशा तीन दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढीस लागली आहे . यामुळे जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे . तसेच सार्वजनीक कार्यक्रमांवर बंदी लादण्यात आली आहे . तरीही कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेता पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांनी शुक्रवार , शनिवार आणि रविवार या तिन दिवशी जनता कर्फ्युचे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. ● यानुसार जळगावात आता तीन दिवसांचा जनता कर्फ्यु असणार आहे . हा जनता कर्फ्यु 11 मार्च 2021 रोजी रात्री आठ वाजता पासून सुरुवात होऊन 15 मार्च 2021 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत राहणार आहे . ● विविध संघटनेच्या माध्यमातून प्रस्तावावरून हा तीन दिवसीय जनता कर्फ्यु लागू करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा...
Comments
Post a Comment