उंटावद तालुका यावल येथे लसीकरणाला गावातून उस्फूर्त प्रतिसाद...


उंटावद गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी सरपंच -श्री.छोटू भगवान भिल,उपसरपंच सौ.भावना शशिकांत पाटील तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष मा.श्री. शशिकांत पाटील आणि किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी 
डॉ.सौ.मनीषा महाजन यांच्या विशेष प्रयत्नांमुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या गावातच लस देण्याची अत्यंत व्यवस्थित नियोजन उंटावद येथील प्राथमिक शाळेत करण्यात आले होते .


संपुर्ण जगासह देशात थैमान घातलेल्या कोव्हीड १९ (कोरोना) या महामारीपासून बचावासाठी संपुर्ण देशभर मोठ्या प्रमाणात लसिकरण होत असुन आरोग्य यंत्रणा अहो रात्र कार्येरत आहे तर किनगाव प्राथमीक आरोग्य केंन्द्रा अंतर्गत येणाऱ्या उंटावद या गावाची १०० टक्के लसिकरणाकडे वाटचाल सुरू असुन आज पर्येंत ८० टक्के लसिकरण येथे झाले आहे तर लवकरच उंटावद गाव हे १०० टक्के लसीकरण होईल यात शंका नाही तसेच ग्रामस्थांचाही लसीकरणाला उस्फुर्त प्रतीसाद मिळत असल्याचे यावेळी डाँ.मनिषा महाजन यांनी सांगीतले

 उंटावद येथील ग्रामस्थ किनगाव प्राथमीक आरोग्य केंन्द्रात जाऊन लसीकरण करून घेत होते व नागरीकांचा लसिकरणाबाबत प्रतिसाद पाहता वैद्यकिय आधीकारी डाँ.मनिषा महाजन यांनी उंटावद येथील जिल्हा परीषदेच्या मराठी शाळेत दि.27 रोजी 165 लसींची व्यवस्था करून दिली आणि दि.30 रोजी 230 आणि दि.4 सप्टेंबर 222 लसींची व्यवस्था करून दिली या त्यामुळे ग्रामस्थांनी डाँ.मनिषा महाजन समुदाय आधीकारी डाँ.वकार शेख ,आरोग्य सेवीका के.आर.सुर्यवंशी ,आरोग्य सेवक विठ्ठल भिसे ,आरोग्य सेवक डि पी तायडे आणि आशा सेवीका किरण पाटील तसेच
वाहन चालक कुर्बान तडवी यांचे आभार व्यक्त केले..

लसीकरण मोहिमेच्या सुरुवातीला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीषा महाजन आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले

 यावेळी सरपंच श्री.छोटू भगवान भिल, उपसरपंच सौ.भावना शशीकांत पाटील, वि.का.सोसायटीचे चेअरमन आबासो शशीकांत गुलाबराव पाटील , ग्रा.प.सदस्य डिगंबर धना सपकाळे,रामचंन्द्र वामन सपकाळे ,लिपीक दत्तात्रय ताराचंद पाटील आणि मुख्याध्यापक ज्ञानेश्वर चौधरी इ.सह ग्रामस्थ उपस्थीत होते.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत