महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ पिंप्राळा जळगाव यांच्या वतीने कोरोना आजारावर उपाय योजना आणि मानसिक स्वास्थ्य वरील मार्गदर्शन ऑनलाईन व्याख्यान.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ पिंप्राळा जळगाव यांच्या वतीने कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी ऑनलाइन व्याख्यान घेण्यात आले
ऑनलाइन व्याख्यान तज्ञ डॉक्टरांनी दिले डॉक्टर दिनेश महाजन मनोचिकित्सक जळगाव यांनी कामगारांना covid-19 संबंधी स्वतः व आपल्या परिवाराचा योग्य पद्धतीने कसा बचाव करावा यासंबंधी योग्य माहिती दिली तसेच पूर्ण मूळे व lockdown मुळे बरेच कामगार आर्थिक विवंचनेतून जात आहेत तसेच विविध अडचणींना देखील तोंड देत आहेत त्यामुळे मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहेत या विषयाला अनुसरून मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी आपल्याला सकारात्मक राहणे आपले छंद जोपासणे योगा करणे अशा वेगवेगळ्या टिप्स डॉक्टरांनी दिल्या...
यावेळी डॉक्टर सौ संगीता अजय पाटील मेडिकल ऑफिसर नाशिक तसेच डॉक्टर सौ भारती बोराने पुणे या उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आयोजन श्री मिलिंद आर पाटील केंद्रसंचालक जळगाव यांनी केले व आभार सौ स्मिता पाटील यांनी मानले
या ऑनलाईन व्याख्यानमालेत साधारण 75 कामगार व कामगार कुटुंबीयांनी लाभ घेतला व त्यांची प्रश्नांची उत्तरे तज्ञ डॉक्टरांकडून समाधानकारक मिळाली.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत