जळगाव शहराच्या सांस्कृतिक समृद्धीला दिशा देणारा एक अभिनव कार्यक्रम भाऊंना भावांजली..

जळगाव शहराच्या सांस्कृतिक समृद्धीला दिशा देणारा एक अभिनव कार्यक्रम म्हणजे परिवर्तन आयोजित - भाऊंना भावांजली महोत्सव होय.
गेल्या पाच वर्षापासून परिवर्तन कला महोत्सव हा उपक्रम (आदरणीय भवरलाल भाऊ) मोठ्या भाऊंच्या भावांजली यानिमित्तानं राबवत आहे ..यातीलच दुसरे पुष्प काल दिनांक 13 डिसेंबर सोमवार रोजी मायादेवी रोटरी हॉल जळगाव येथे संस्कृतीक समृद्धी आणि माझे जळगाव या विषयांवर चर्चासत्र आयोजित करून गुंफण्यात आले.

या परिसंवादात जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला, विचार मंचावर चर्चासत्रास खास आमंत्रित मान्यवर आणि या कार्यक्रमास उपस्थित जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील कार्यरत असलेले जवळपास सगळ्याच घटकांचे प्रतिनिधी ,ज्यांचे या शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीत योगदान किंवा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असतो असे सुज्ञ, बुद्धिजीवी श्रोते , प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते अश्या सुजाण आणि सुज्ञ लोकांची मांदियाळी या परिसंवादास लाभली .

चर्चासत्रात सहभागी मान्यवरांनी अगदी मोजक्या शब्दात पण प्रभावी मांडणी करीत शहराच्या सांस्कृतिक समृद्धीबाबत आपली मते , अनुभव व अपेक्षा तर मांडल्याच पण सोबत त्यासाठी काय उपाययोजना करता येईल व आपण सर्व त्यासाठी काय योगदान करू शकतो यावर वास्तववादी चिंतन केले. या परिसंवादासाठी खास पुण्याहून आलेले मात्र ज्यांची जळगावशी अनेक वर्षांची सलगी असलेले ख्यातनाम संपादक  डॉ.सुधीर भोंगळे यांनी आपलं मत मांडताना म्हटलं की संस्कृती ही प्रत्येक ठिकाणी बदलत असते अगदी कॅलिडोस्कोप सारखी. खरंतर पोटाची भूक भागल्यानंतर व मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर जो समाधानाचा ढेकर निघतो त्यानंतर संस्कृतीचा जन्म होतो.. म्हणजेच शहरातील दुर्बल, दुर्लक्षित घटकांसाठी काम केलं पाहिजे तर सुदृढ संस्कृती निर्माण होईल. तसेच जळगावचे प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रदीप जोशी म्हणाले गावची संस्कृती टिकवण्यासाठी व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्व नागरिकांनी नीतीमान लोकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. फक्त धन व ताकदीच्या जोरावर पुढे येणाऱ्यांच्या सोबत नव्हे.

जळगाव शहरबद्दल कोणी चुकीचं बोललं तर चीड येते संताप होतो.. आपल्या शहराची प्रतिमा आपणच बनवली आहे बाहेरून आलेल्यांनी नव्हे. चुका शोधणे, टीका करणे आणि उपदेश देणे हे सर्वात सोपे काम आहे ,परंतु जो बदल करण्यासाठी धडपडतो त्याला साथ दिली पाहिजे असे मनोगत जैन उद्योग समुहाचे उपाध्यक्ष श्री अतुल जैन यांनी व्यक्त केले.

डॉ.अग्रवाल म्हणाल्या आजची पिढी ही टेक्नॉलॉजिकल स्ट्रॉंग आहे परंतु इमोशनली वीक आहे. त्यांचे स्वप्न आणि त्यांचे आदर्श अगदी वेगळे आहेत,त्यांना सर्व अगदी पटकन हव आहे आणि त्यातून अनेक अडचणी निर्माण होतात. त्या दूर करण्यासाठी ज्येष्ठांचा एक मंच तयार व्हायला हवा आणि हा मंच मुलांचे ठराविक कालावधीनंतर समुपदेशन करेल.

या चर्चासत्रात दीपस्तंभचे श्री.यजुर्वेंद्र महाजन ,श्री.भरत दादा अमळकर, डॉ.राजेश पाटील ,श्री.छबिराज राणे,डॉ.रेखा महाजन ,श्री.शिवराम पाटील आणि श्री.गनी मेमन या मान्यवरांनी देखील या परिसंवादात आपले दर्जेदार मुद्दे व शहराबद्दलचे अनुभव कथीत केले. या परिसंवादातून खऱ्या अर्थाने शहराच्या सांस्कृतिक समृद्धीसाठी सर्वच क्षेत्रात कशी भरीव कामगिरी करता येईल यासाठी विचारमंथन झाले.

भविष्यातील शहराच्या सांस्कृतिक समृद्धी सोबतच ,पायाभूत विकासासाठी नवीन उपक्रमांची (प्रकल्पांची)अप्रत्यक्ष मुहूर्तमेढच या चर्चासत्राच्या माध्यमातून रोवली गेली असं म्हणणं धाडसाचं नक्कीच ठरणार नाही असं मला वाटतं.

या चर्चासत्राची भूमिका तसेच प्रस्तावना श्री.अनिष शहा यांनी मांडली तर सदाबहार सूत्रसंचालन श्री हर्षल पाटील यांनी केलं.

जळगाव शहर सांस्कृतिक जिवंत ठेवण्यामागे आदरणीय शंभू आण्णा व परिवर्तन परिवाराचे अविरत प्रयत्न व मोलाचे योगदान यांचा सिंहाचा वाटा आहे. यासाठी मी संपूर्ण परिवर्तन परिवाराचे मनःपूर्वक आभार मानतो .परिवर्तन सदैव अभिनव उपक्रम जसे की उत्तम पुस्तकांचे अभिवाचन, चित्रकला ,नाटक व्याख्याने असे विविध उपक्रमांच्या माध्यमातून आमच्यासारख्या तरुणांच्या वैचारिक कक्षा रुंदावण्याचे कार्य करत असते ,आमचे विचार अजून प्रगल्भ करीत असते .

पुन्हा एकदा आपल्या अथक प्रयत्नांसाठी परिवर्तन परिवाराचे मनःपूर्वक आभार आणि या अत्यंत स्तुत्य आणि अभिनव उपक्रमास आमंत्रित केल्याबद्दल आयोजकांचे आभार

धन्यवाद
संदीप निंबाजी पाटील (सोनवणे)
स्वयंदीप प्रतिष्ठान- डांभुर्णी
दीपस्तंभ फाउंडेशन -जळगाव
उपसंपादक-दिनवार्ता जळगाव
सदस्य-महिला शक्ती केंद्र निवड समिती 
(जिल्हास्तरीय महिला समिती) जळगाव
Rural development is pre condition of urban happiness
7755924392

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत