विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे यांना दुपारच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका.
विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे यांना दुपारच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका आला दुपारी. जळगाव येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र, पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलविण्याचा निर्णय घेण्यात आले.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने मुंबईत आणण्यात येणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने या घटनेची गंभीर दाखल घेतली असून त्यांनी खडसे यांना मुंबईला आणण्यासाठी एअर अम्बुलन्सची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.एकनाथ खडसे यांना मुंबईला हलविण्याची तयारी करण्यात येत होती. मात्र, तातडीने उपचार करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी प्रशासनाला खडसे यांच्यासाठी एअर अम्बुलन्सची व्यवस्था करण्याचा सूचना दिल्या. सूत्रांच्या हवाल्याने आता मिळालेल्या माहितीनुसार आमदार एकनाथ खडसे साहेब यांची तब्येत स्थिर आहे.
Comments
Post a Comment