महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पिंप्राळा यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिन जनजागृती ऑनलाइन कार्यक्रम संपन्न.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पिंप्राळा ,जळगांव यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून योग जनजागृती कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण यूट्यूब चैनलवर पूर्ण लाईव्ह करण्यात आले, ह्या कार्यक्रमाचा लाभ महाराष्ट्रातील कामगार व त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला.
याप्रसंगी तज्ञ योगशिक्षक श्री समाधान काशिराम बरकले तसेच श्री कमलाकर येवले हे तज्ञ शिक्षक उपस्थित होते यांनी स्वतः योगाचे संपूर्ण अभ्यासपूर्वक माहिती व प्रशिक्षण दिले..
तसेच श्री गोपाल पाटील ,सेट न्यूज चैनल चे प्रमुख तसेच श्री रमेश साळुंखे समाजसेवक हे उपस्थित होते या कार्यक्रमाला श्री कुंदन खेडकर कामगार कल्याण अधिकारी , जळगाव हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाची संपूर्ण आयोजन श्री मिलिंद आर पाटील, केंद्रसंचालक, जळगाव यांनी केले तसेच कुमारी मैत्रीय शंतनू पाटील, कुमार शुभम गोपाल पाटील यांचे सहकार्य लाभले
Comments
Post a Comment