माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरी ईडीचा छापा

 राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) छापा टाकला असून झाडाझडती सुरू आहे. सकाळी ८ वाजताच ईडीचे अधिकारी अनिल देशमुख यांच्या घरी दाखल झाले आहेत. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार ईडीकडून अनिल देशमुख यांची चौकशी सुरू झाली आहे. याच अंतर्गत हा छापा टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. 

 

 


 

सीबीआयकडून ११ तास चौकशी
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (CBI) २१ एप्रिल रोजी अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकून सलग ११ तास चौकशी केली होती. त्यावेळी सीबीआयने अनिल देशमुखांच्या घरातील काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीाआयने गुन्हा दाखल करुन त्यांच्या घरावर छापेही मारण्यात आले होते.

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत