जिल्हयात कोरोनाचा कहर 487 रुग्ण आढळले.
जळगाव – जिल्ह्यात आज कोरोनाचा कहर 487 कोरोना बाधित रूग्णआढळले असून एकूण रुग्णसंख्या 13 हजार 574 झाली आहे. सर्वाधिक 99 कोरोबाधाीत रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 8 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे शुक्रवारी दिवसभरात 199 बाधीत रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर सुरुच आहे. शुक्रवारी जिल्ह्यात कोरोनाचे व्रिकमी रुग्ण आढळून आले असून कोरोनाने चारशेचा आकडा पार केला आहे. शुक्रवारी नव्याने 487 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 99, जळगाव ग्रामीण 31, भुसावळ 23, अमळनेर 32, चोपडा 45, पाचोरा 8, भडगाव 43, धरणगाव 17, यावल 9, एरंडोल 79, जामनेर 28, रावेर 6, पारोळा 34, चाळीसगाव 26, बोदवड 4 इतर जिल्ह्यातील 3 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 8 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर, अमळनेर, चोपडा, पाचोरा, यावल, रावेर, पारोळा व चाळीसगाव तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment